कवी मनाचे मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या प्रासंगिक कवितांनी राजकारणात अनेकदा चर्चा घडवल्या आहेत, मग ते लोकसभेत असो वा पत्रकारांशी बोलताना अनेक विषयांवर आपल्या खास शैलीत आठवले काव्यातून भाष्य करत असतात. अशीच एक बहुप्रतीक्षित चारोळी त्यांनी कोरोना व्हायरसवर (Coronavirus) सुद्धा केली आहे. अलीकडेच त्यांचा गो कोरोनाचा (Go Corona) घोषणा देणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर आता त्यांनी कोरोना हटवण्यासाठी कवितेचे अस्त्र उगारल्याचे समजत आहे. आपल्या कवितेतून आठवले यांनी थेट कोरोनाला आम्ही तुझे बारा वाजवू असा इशारा दिला आहे .काहीच वेळात आता आठवले यांनी कोरोनाची कविता सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. आपल्या या कवितेच्या या गो कोरोनाच्या घोषणेतून निदान यान विषयी जनजागृती झाली त्यामुळे लोक कोरोनापासून वाचण्यासाठी आणि त्याला लढा देण्यासाठी सज्ज होतील असा आशावाद आठवले यांनी नुकताच पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.नागपूर मध्ये कोरोना व्हायरसचे दोन नवे रुग्ण; राज्यातील एकूण 17 जणांना लागण
रामदास आठवले यांची कोरोना वरील कविता
रामदास आठवले यांनी कवितेत, 'कोरोना गो ये मैने दिया था नारा, इसलिए जाग गया भारत सारा, कोरोना जैसा चमक रहा है 110 देशों में तारा, एक दिन हम बजायेंगे करोना के बारा" अशा मोजक्या चार ओळी लिहिल्या आहेत. त्यांच्या या शैलीची अनेकदा सोशल मीडियावर मस्करी होत असते. अलीकडेच त्यांचा गो कोरोना व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी त्यांना ट्रोल केले होते, मात्र माझ्या घोषणेमुकें कोरोनाची महाराष्ट्रातील संख्या कमी आहे असा दावा करत त्यांनी आपली बाजू मांडली आहे , तसेच कोरोना भारतातून निघून जाईपर्यंत आपण ही घोषणा देत राहणार असेही आठवले म्हणाले.
दरम्यान, कोरोनाच फैलाव हा खरोखरच गंभीर प्रश्न ठरत चालला आहे. आतापर्यंत जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोनाचे भारतात सुद्धा 82 रुग्ण आढळले आहे, तर यातील 17 रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. राज्यात पुणे येथे सर्वाधिक असे कोरोनाचे 10 रुग्ण, मुंबईत 3, नागपूर येथे 3 आणि ठाणे मध्ये 1 कोरोना पीडित रुग्ण आढळला आहे. या सर्व रुग्णांवर तातडीने उपचार केले जात असून सर्व संशयितांना सुद्धा देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.