Parliamentary (File Image)

राज्यसभा (Rajya Sabha) सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankha) यांनी लोकसभा अध्यक्षांसोबत (Lok Sabha Speaker) सल्लामसलत करुन संसदीय स्थायी समित्यांची पुनर्रचना (Parliamentary Standing Committees) केली आहे. यामध्ये एकूण आठ समित्यांचा समावेश आहे, असे वृत्त एअनआय या वत्तसंस्थेने दिले आहे. नवीन संसदीय स्थायी समित्या 13 सप्टेंबर 2023 पासून लागू होतील. या समित्यांमध्ये शिक्षण, महिला, मुले, युवक आणि क्रीडा समिती, आरोग्य आणि कुटुंब कल्याण समिती, गृहनिर्माण समिती, उद्योग समिती, आदींचा समावेश आहे. या समित्यांवर कोणाची नियुक्ती झाली याबाबत आपण येथे माहिती पाहू शकता.

पुनर्रचना करण्यात आलेल्या समित्या

  • वाणिज्य (Commerce)
  • शिक्षण, महिला, मुले, युवक आणि क्रीडा (Education, Women, Children, Youth and Sports)
  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण (Health and Family Welfare)
  • गृह व्यवहार (Home Affairs)
  • उद्योग (Industry)
  • कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्याय (Personnel, Public Grievances, Law and Justice)
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वन आणि हवामान बदल (Science and Technology, Environment, Forrest and Climate Change)
  • वाहतूक, पर्यटन आणि संस्कृती (Transport, Tourism and Culture)

ट्विट

भारतीय संसदेमध्ये स्थायी आणि इतरही समित्यांना अत्यंत महत्त्व असते. स्थायी समिती ही संसद सदस्य किंवा खासदारांचा समावेश असलेली समिती असते. ही एक कायमस्वरूपी आणि नियमित समिती आहे जी वेळोवेळी संसदेच्या कायद्याच्या तरतुदींनुसार किंवा कार्यपद्धती आणि व्यवहाराच्या नियमांनुसार स्थापन केली जाते. भारतीय संसदेने केलेले काम हे केवळ विपुलच नाही तर गुंतागुंतीचेही आहे, त्यामुळे या संसदीय समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले जाते. देशासमोरी असलेल्या विविध प्रश्न, समस्या आणि इतर प्रकरणांचा अभ्यास करणे त्यावर विचारविनीमय करुन तोडगा काढणे, ज्यामुळे सरकार आणि सभागृहाचे काम सोपे होईल, असा या समित्यांचा उद्देश असतो. या समित्या त्या त्या सरकारच्या काळामध्ये बदलत असतात.