Indian Money | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राजश्री बुधवार साप्ताहिक लॉटरी (Rajshree Wednesday Weekly Lottery) तिकीट खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचादिवस महत्त्वाचा आहे. या आठवडी लॉटरीची आज (11 सप्टेंबर) रात्री आठ वाजता सोडत (Rajshree Lottery Result) होणार आहे. तिकीट दर आणि बक्षीसाची तुलना करता विजेत्याला मोठा लाभ होणार आहे. अर्थात लाभार्थ्याची संख्या मर्यादितच असणार आहे. त्यामुळे अनेकांना नशीब आजमविण्याची संधी असली तरी, मोजक्याच मंडळींचे नशीब फळफळणार आहे, हे निश्चित. गोवा राज्य सरकारद्वारे राजश्री लॉटरी आयोजित केली जाते. या लॉटरीची वेगवगळ्या दिवशी निरनिराळ्या नावाने सोडत काढली जाते. ही नावे आणि सोडतीचे दिवसही निश्चित असतात. राजश्री बुधवार साप्ताहिक लॉटरी बक्षीस रक्कम घ्या जाणून.

साप्ताहीक सोडत आणि बक्षीस रक्कम

राजश्री बुधवार साप्ताहिक लॉटरीची सोडत एकूण चार वर्गवारीत काढली जाते. प्रत्येक वर्गवारीनुसार बक्षीस रक्कम आणि त्यांची संख्या बदलत असते. सोडत, बक्षीस रक्कम आणि वर्गवारी खालील प्रमाणे.

  • प्रथम क्रमांकाचे बक्षीस: एकूण रक्कम 5 लाख रुपये (एकूण बक्षीस संख्या 1)
  • दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस: एकूण रक्कम 9,000 रुपये (एकूण बक्षीस संख्या 1)
  • तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस: एकूण रक्कम 1000 रुपये (एकूण बक्षीस सख्या 10)
  • चौथ्या क्रमांकाचे बक्षीस: एकूण रक्कम 410 रुपये (एकूण बक्षीस संख्या 10)
  • पाचव्या क्रमांकाचे बक्षीस: एकण रक्कम 150 रुपये (एकूण बक्षीस संख्या 100)

वाचकांच्या माहितीसाठी आसे की, राजश्री लॉटरी सोडत निकाल आपण अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता. आपले नशीब आजमविण्यासाठी अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर लॉटरीचे तिकीट खरेदी करतात. त्यामुळे राज्य सरकारलाही महसूल मिळतो आणि भाग्यवान ग्राहकांनाही काही चांगलेच पैसे मिळतात. अर्थात हे पैसे राज्य आणि केंद्र सरकारचे विविध कर आणि नियम व कायदे यांना अधिन असतात. त्यामुळे बक्षीसात जाहीर झालेली किंवा घोषीत केलेली पूर्ण रक्कम विजेत्याला मिळेलच असे नाही. (हेही वाचा, Rajshree Lottery Result Today: राजश्री लॉटरी निकाल आज जाहीर होणार; येथे पाहा संपूर्ण विजेता यादी)

दरम्यान, गोवा राज्य सरकारच्या राज्य लॉटरी संचालनालय आणि राष्ट्रीय बचत संस्था यांचे विलीनीकरण करून लघु बचत आणि लॉटरी संचालनालय या नावाने एक विभाग स्थापन करण्यात आला. त्यासाठी राज्य लॉटरी संचालनालयाची निर्मिती करण्यात आली. हे संचालनालय राज्य लॉटरीचे संचालन, आयोजन आणि प्रचार करते. राज्य ससरकारच्या लॉटरी विभागाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीनुसार, सरकारने राजपत्र अधिसूचना क्रमांक JS(Bud)/32/2010 दिनांक 7 मे, 2010 द्वारे ऑनलाइन आणि पेपर लॉटरी सुरू केली. दरम्यान, सदर लॉटरी सोडत निकाल आणि अधिक माहिती आणि इतर तपशिलांसाठी जीज्ञासू वाचक निकाल विभागाच्या www.statelotteries.goa.gov.in वेबसाइटवर आणि अधिकृत राजपत्र https://goaprintingpress.gov.in ला भेट देऊन माहिती घेऊ शकतात.

वाचकांसाठी महत्त्वाची सूचना: वरील लेखात उल्लेखीत मजकूर हा उपलब्ध आणि प्राप्त माहितीवर आधारीत आहे. त्यामुळे त्याचा अन्वयार्थ लावताना बक्षीस रक्कम, संख्या अथवा इतर तपशीलात अर्थभिन्नता असू शकते. परिणामी वाचकांनी कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करताना आणि लॉटरी तिकीट खरेदीबाबत अथवा त्याबाबत निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.