Ashok Gehlot, Vasundhara Raje

राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 (Rajasthan Assembly Election Results 2023) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (3 डिसेंबर) सकाळी आठ वाजलेपासून सुरु झाली आहे. सुरुवातीपासूनच या राज्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. पण, राजस्थान राज्याचा पाठिमागील काही वर्षांचा अनुभव पाहता, या राज्यातील जनता कोणालाही सत्तेवर सलगपणे ठेवत नाही. त्यामुळे सिंहासन बदलत राहते. या वेळी त्यात बदल होईल असे म्हटले जात होते. मात्र, मतमोजणीदरम्यानचे सुरुवातीचे काही कल हाती आले आहेत. त्यानुसार राजस्थानमध्ये भाजप आघाडी घेताना दिसत आहे. तर अशोक गहलोत यांचा काँग्रेस पक्ष काहीसा पिछाडीवर दिसत आहे. अर्थात हे सर्व प्राथमिक आकडे आहेत. त्यामुळे संपूर्ण निकाल हाती येईपर्यंत काहीही सांगता यात नाही.

राजस्थानमध्ये भाजप सरकार बनविण्याची चिन्हे

राजस्थानमध्ये 199 जागांसाठी विधानसभा निवडणूक पार पडली. ज्याची मतमोजणी सध्या सुरु आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, भारतीय जनता पक्ष राजस्थानमध्ये सरकार बनवतान्याची चिन्हे दिसत आहेत. प्राप्त माहितीनुसार, भाजप 102 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 75 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, भाजप 101 जागांवर तर काँग्रेस 72 जागांवर आघाडीवर आहे. बहुतांश 'एक्झिट पोल'मध्येही राजस्थानमध्ये भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, काही 'एक्झिट पोल' काँग्रेसच्या विजयाचे भाकीतही करत होते. त्यामुळे निकालांबाबत प्रचंड उत्सुकता आहे. (हेही वाचा, Rajasthan Assembly Polls 2023: राजस्थान मध्ये निवडणूक निकालांच्या कलांमध्ये भाजपा आघाडीवर; कार्यकत्यांमध्ये जल्लोष)

भाजपच्या आघाडीची प्रमुख कारणे

खरे तर राजस्थानमध्ये प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सरकार बदलण्याची 'प्रथा' चालत आली आहे. त्यामुळे कोणालाही या राज्यात सलगपणे सत्ता मिळण्याची शक्यता कमीच असते. या निवडणुकीतही तोच ट्रेंड पाहायला मिळतो आहे. हा ट्रेण्ड जो भाजपच्या विजयात मोठा घटक मानला जाऊ शकतो. दुसरीकडे, राजस्थानमधील प्रत्येक निवडणुकीत सरकार बदलण्याची 'प्रथा' बदलेल आणि मतदार पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी देतील, अशी आशा सत्ताधारी काँग्रेसला होती. काँग्रेसच्या या आशेचा मुख्य आधार अशोक गेहलोत सरकारचे काम आणि लोककल्याणकारी योजना होत्या. मात्र, तरीही येथील जनता पारंपरीक राजकीय भूमकाच निभावताना सध्यातरी दिसते आहे.

काँग्रेसमध्ये अंतर्गत दुफळी, भाजपमध्ये एकवाक्यता

राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने यावेळी मुख्यमंत्री पदाचा 'चेहरा' जाहीर केला नाही. मात्र, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना त्यांचे समर्थक संभाव्य दावेदार मानतात. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांचा गट एकतर्फी सत्ताधारी काँग्रेस पक्षात सक्रिय होता. यावेळी भाजपमध्ये गटबाजी दिसली नाही. वसुंधरा राजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत निवडणूक रॅलींदरम्यान स्टेज शेअर करताना दिसल्या. त्यामुळे भाजपमधील एकसूत्रता मतदारांना भावली असावी, असा प्राथमिक अंदाज काढता येतो.