Rahul Gandhi in Lok Sabha | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

संसदेच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर चर्चा सुरु असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज (1 जुलै) आक्रमक पाहायला मिळाले. सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर राहुल गांधी (Rahul Gandhi in Lok Sabha) यांनी जोरदार हल्ला चढवला. खास करुन हिंदुत्व, मणिपूर, जीएसटी, नोटबंदी, नीट परीक्षेतील भ्रष्टाचार यांसारख्या विविध मुद्द्यांवर त्यांनी केंद्रावर टीका केली. आपल्या भाषणादरम्यान, त्यांनी भगवान शिव-शंकराची प्रतिमा (Rahul Gandhi shows Shiva photo in Lok Sabha) असलेले पोष्टर झळकवल्यामुळे सत्ताधारी काहीसे आक्रमक झाले. त्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही काहीशी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, हिंदू धर्म भय, द्वेष आणि खोटेपणाचा प्रचार करत नाही, असे प्रतिपादन करत गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला.

संसदेत काय घडले?

राहुल गांधी यांचे आरोप: भाजपवर भीती आणि द्वेष पसरवून हिंदू धर्माचे सार विकृत करत आहे, असा आरोप करतानाच राहुल गांधी यांनी हिंदू, इस्लाम आणि शीख धर्मासह सर्व धर्म धैर्य आणि निर्भयतेचा पुरस्कार करतात यावर त्यांनी भर दिला. दरम्यान, त्यांनी भगवान शिवची प्रतिमा असलेले पोस्टर सभागृहात दाखवले. (हेही वाचा, Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधीदरम्यान राहुल गांधींनी दाखवली संविधानाची प्रत; काँग्रेसकडून व्हिडिओ शेअर(Watch Video))

लोकसभा अध्यक्षांचा आक्षेप: ओम बिर्ला यांनी फलकांच्या प्रदर्शनाविरुद्धच्या नियमांचा हवाला देत सभागृहात राहुल गांधी यांनी सभागृहात भगवान शिवाचे चित्र दाखवण्यावर आक्षेप घेतला.

पंतप्रधान मोदी यांचा व्यत्यय: राहुल गांधी यांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक संबोधण्याच्या गंभीरतेवर प्रकाश टाकला.

राहुल गांधींची प्रतिक्रिया: सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या आक्षेपाला भाजप आणि संपूर्ण हिंदू समाज आणि हिंदुत्व यांच्यात फरक करून प्रत्युत्तर दिले आणि सत्ताधारी पक्षावर केलेल्या टीकेचा पुनरुच्चार केला. (हेही वाचा, SC Justice On Hinduism: ‘हिंदू धर्म ही जीवनपद्धती आहे, तो कट्टरतेला परवानगी देत नाही'- सर्वोच्च न्यायालय)

व्हिडिओ

राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला करताना भाजपने केंद्र सरकारच्या माध्यमातून घटना आणि भारताच्या मूलभूत कल्पनेवर पद्धतशीरपणे हल्ला केल्याचा आरोप केला. याशिवाय अनेक कायदेशीर प्रकरणे आणि अंमलबजावणी संचालनालयाकडून विस्तृत चौकशी यासह वैयक्तिक हल्ल्यांना तोंड द्यावे लागल्याचा त्यांनी उल्लेख केला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी उभा केलेल्या आव्हानांना न जुमानता संविधानाच्या रक्षणासाठी सामूहिक प्रयत्न केल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर उपहासात्मक टिका करतानाा त्यांचा (मोदी) मोदींचा थेट देवाशी संबंध असल्याबद्दल उपहासात्मक टिप्पणी केली आणि महात्मा गांधींच्या जिवंत वारशाबद्दल त्यांच्या कथित अज्ञानावर टीका केली.

एक्स पोस्ट

दरम्यान, राहुल गांधी यांच्या भाषणावेळी सत्ताधारी बाजूकडी सदस्य बरेच आक्रमक असल्याचे दिसले. काही काळ लोकसभेत गदारोळही पाहायला मिळाला. पण राहुल गांधी यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत सत्ताधारी वर्गावर हल्ला चढवला.