Photo Credit- X

Pushpa 2 Box Office Collection Day 5: अल्लू अर्जुन (Allu Arjun),रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) स्टारर 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 The Rule) हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. पहिल्या दिवसापासून चित्रपटानं बॉक्स ऑफिस (Box Office) हादरवून सोडलं आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'पुष्पा 2नं यावर्षीच्या चित्रपटांचे अनेक विक्रम मोडले, आठवडाभराच्या आत चित्रपटाने निर्मीतीचे सगळे पैसे वसूल केले आहेत. 'पुष्पा 2: द रुल' नं अनेक रेकॉर्डही आपल्या नावे केले आहेत. सोमवारी मात्र चित्रपटाच्या कमाईत काहीशी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं. (हेही वाचा:Pushpa 2 - The Rule: 'पुष्पा 2 - द रुल' ने फक्त 3 दिवसांत 600 कोटींचा ओलांडला टप्पा; आंतरराष्ट्रीय स्तरावर जलद कमाई करणारा ठरला चित्रपट)

'पुष्पा 2: द रुल' चित्रपटानं यावर्षीच्या चित्रपटांचे अनेक विक्रम मोडले आहेत. त्याने शाहरूखचा जवान, गदर, आरआरआरला मागे टाकले आहे. मात्र कलेक्शनमध्ये काहीशी कमी आल्याने चिंता व्यक्त केला जात आहे. 'पुष्पा 2: द रुल'नं पहिल्या सोमवारी 64.1 कोटींची कमाई केली आहे, ज्यामधलं सर्वाधिक कलेक्शन 47 कोटींचं हिंदीमध्ये होतं. रविवारच्या तुलनेत सोमवारी फिल्मच्या कमाईत जवळपास 54.56 टक्क्यांची घट पाहायला मिळाली. एकूण या चित्रपटानं आतापर्यंत 593.1 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

चित्रपटाची वर्ल्डवाईड कमाई किती?

जगभरातील आकडेवारीवर नजर टाकली तर पुष्पा 2 नं 870 कोटींचा आकडा गाठला आहे. 'पुष्पा 2' नं रविवारपर्यंत जगभरात 795.50 कोटी रुपयांची कमाई केली असून या चित्रपटानं जगभरात 163.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे.दरम्यान, पुष्पा 2नं आतापर्यंत सर्वाधिक कमाई हिंदीमध्ये केली आहे. आतापर्यंत पुष्पा 2 च्या एकूण कमाईपैकी 332.7 कोटी रूपये फक्त हिंदीमधून आले आहेत. तर ओरिजनल लँग्वेज तेलुगूमध्ये या चित्रपटानं आतापर्यंत 211.7 कोटींची कमाई केली आहे.