पंजाब येथील एका दहा वर्षाच्या मुलीला टिक टॉक स्टार बनण्याची फार इच्छा होती. मात्र या मुलीने घराच्या बाथरूममध्ये असलेल्या पाईपच्या आधारे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शरीरावर टॅटू आणि फॅशन करण्याच्या तिच्या हट्टामुळे पालकांनी तिला नेहमीच ओरडता मिळत होता. तर बुधवारीसुद्धा आईने फटकारल्यानंतर रात्री पावणेदहाच्या सुमारास गळफास घेऊन आयुष्य संपवले.
घरातील मंडळींना आपल्या मुलीने गळफास लावल्याची गोष्ट कळली असता तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . मात्र उपचारापूर्वी तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला घरी आणले आणि सकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. याबाबत नातेवाईकांनाही माहिती देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी मुलीचे मृत शरीर शवविच्छेदनासाठी दिले असता तिच्या गळ्याच्या येथे ओढणीचे वळ दिसून आले. तसेच मानेकडील हाड सुद्धा तुटल्याने दिसून आले. सुरुवातीच्या चौकशीत असे दिसून आले आहे की, सामान्य घरातील लोकांप्रमाणेच आई-वडील तिला वाईट वागणुकीसाठी ओरडत होते.
डबे पुरवण्याचे काम करणाऱ्या राकेश कुमार यांनी असे म्हटले की, त्यांची दहा वर्षीय मुलगी फैटनगंज सेंट सोल्जर डिवाइन शाळेत चौथ्या इयत्तेत शिकत होती. बुधवारी डबे देण्यासाठी गेलो होतो. त्याचवेळी मुलीने गळफास लावून घेतल्याची घटना घडली असल्याचे सांगितले आहे.(गोरखपूर: TikTok व्हिडिओ बनवण्यासाठी दोन तरुणांची पूलावरुन उडी, एकजण बेपत्ता)
मात्र गेल्या काही महिन्यांपासून टिकटॉकच्या व्हिडिओमुळे काही जणांना आपला जीव गमावावा किंवा गंभीर दुखापत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता भर पडली असून एक टिकटॉकवर व्हिडिओ बनवण्यासाठी चक्क तरुणाला झाडाच्या फांदीला लटकवले असल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पंजाब हरियाणामधील असून तरुणाच्या गळ्यात दोरी लावून फाशीवर चढवल्यासारखे त्याला झाडाला लटकवण्यात आले होते.