गोरखपूर: TikTok व्हिडिओ बनवण्यासाठी दोन तरुणांची पूलावरुन उडी, एकजण बेपत्ता
TikTok (Photo Credits-Gettey Images)

गोरखपूर (Gorkhpur) येथे तरुण तरुणांनी टिकटॉकचा (TikTok) व्हिडिओ बनवण्यासाठी चक्क पूलावरुन उडी घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन मुलांपैकी एक मुलगा हरविला असल्याचे सांगण्यात येत असून त्याचा शोध घेतला जात आहे.

दानिश आणि आशिक अशी दोन तरुण मुलांची नावे आहेत. दिऔरिया जिल्ह्यात असणाऱ्या पूलावरुन उडी घेत टिकटॉकचा धक्कादायक व्हिडिओ शूट करत होते. मात्र व्हिडिओ शूट करणाऱ्यासाठी पूलावरुन उडी घेतलेली, त्यानंर दानिश याने सुद्धा उडी घेत असल्याचा व्हिडिओ शूट केला. मात्र दोन्ही मुलगा काही वेळाने दिसेनासा झाला.(पत्नीला लागले होते Tik-Tok चे वेड, पतीने रागाच्या भरात केला खून; सोशल मीडियामुळे दोन मुले असलेल्या संसाराची वाताहत)

तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांना या प्रकाराबद्दल पोलिसांना कळवले. मात्र काही जणांनी दानिश याला वाचवले. मात्र आशिक याचा शोध अद्याप सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दानिश हा औरंगाबाद येथे राहणारा असून तो हैदराबाद मध्ये नातेवाईंकांकडे राहण्यासाठी आला होता.