पुलवामा: अवंतिपुरा मध्ये चकमक; एक दहशतवादी ठार
भारतीय जवान (Photo Credits: PTI)

आज सकाळी पुलवामा (Pulwama)  जिल्ह्यातील अवंतीपुरा (Awantipora) येथे भारतीय सुरक्षा रक्षक (Indian Security Forces)  आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) पुन्हा एकदा चकमक झाली, ज्यामध्ये एका दहशवाद्याला ठार करण्यात सैन्य दलाला यश आले आहे. यानंतर काहीच वेळात स्थिती पुर्वव्रत झाली मात्र तरीही या हल्ल्यामुळे काही काळ सीमालगत भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित मृत दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही मात्र त्याबाबत पोलीस सविस्तर तपास करत आहेत. जम्मू-कश्मीर: श्रीनगर येथे दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, 7 जण गंभीर जखमी

प्राप्त माहितीनुसार, यापूर्वी नववर्षाच्या रात्री म्हणजेच 31 डिसेंबर आणि 1  जानेवारी च्या मध्यरात्री नौशेरा येथे सीमेवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता, यामध्ये भारतीय सैन्याचे दोन सैनिक शहिद झाले होते. या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सैनिकांची नावे नाईक सावंत संदीप रघुनाथ आणि रायफलमॅन अर्जुन थापा मगर अशी होती.

ANI ट्विट

दरम्यान, मागील वर्षी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्या नंतर अनेकदा हा जिल्हा दहशतवाद्यांचा निशाणा ठरला होता, तब्बल 8 ते 10 वेळेस याठिकाणी चकमकी झाल्या आहेत, यात कधी भारतीय सैन्य वरचढ ठरून दहशतवाद्यांवर भारी पडत होते तर कधी त्यांचा कपटी हल्ला सफल होत होता. या सर्व घटनांमुळे सीमालगत भागात ताणतणाव व कडक सुरक्षा पाहायला मिळत आहे.