जम्मू काश्मीर: त्राल येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतावाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 1 दहशतवाद्याचा खात्मा; शोधमोहिम सुरु
Representational Image (Photo Credit: PTI)

जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) मधील पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील अवंतीपोर (Awantipora) मधील त्राल (Tral) येथील चेवा उलार (Chewa Ular) येथे पुन्हा एकदा सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली होती. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. शोध मोहीम अजूनही सुरु असल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir Police) दिली आहे. (Jammu Kashmir: पुलवामा येथे चकमकीत 2 दहशतवादी ठार; एक CRPF जवान शहीद)

या भागात 2-3 दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सीआरपीएफचे जवान, सैन्य आणि पोलिस यांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली. यावेळी दहशतावाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार सुरु केला. त्यानंतर सुरक्षा दलाकडूनही गोळीबार सुरु करण्यात आला. त्यात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. (जम्मू कश्मीर: लकड़पोरा भागामध्ये दहशतवाद्यांविरोधी सर्च ऑपरेशन पूर्ण; JeM चा एक दहशतवादी ठार दुसरा फरार)

ANI Tweet:

सातत्याने होत असलेल्या चकमकीमुळे गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. गुरुवारी उत्तर काश्मीर मधील सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. तर 23 जून रोजी पुलवामाच्या बंडजू भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. यात सीआरपीएफचा एक जवानही शहीद झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून काश्मीर खोऱ्यात एकूण 36 ऑपरेशन्स झाली असून त्यात 92 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तर दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 126 लोकांना अटक करण्यात आली आहे.