Representational Image (Photo Credit: PTI)

Encounter in Awantipora: जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) अवंतीपोरातील (Awantipora) त्राळ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक चालू आहे. या चकमकीत दोन अज्ञात दहशतवादी ठार झाले आहेत. पोलिस आणि सुरक्षा दलाने ही कारवाई सुरूच ठेवली आहे. काश्मीर झोन पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी अवंतीपूरा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला झाला होता.

जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोराच्या त्राळमध्ये दहशतवादी एका धार्मिक ठिकाणी दाखल झाले आहेत. सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर घेरला आहे. सध्या अतिरेक्यांना शरण जाण्यास सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुप्तचर संस्थेला त्राळमधील नोबुग भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस आणि सुरक्षा दलाने परिसर घेरला. यावेळी दहशतवादी तेथील धार्मिक स्थळात लपले. (वाचा - जम्मू-काश्मीर: शोपियन भागात भारतीय सैन्याशी झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा)

सध्या दहशतवाद्यांना धार्मिक स्थळाच्या बाहेर येऊन शरण जाण्यासं सांगितलं जात आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात गुरुवारी एका चकमकीत तीन अज्ञात दहशतवादी ठार झाले. तर एक सुरक्षा रक्षक जखमी झाला होता. बाबा मोहल्लामध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिकारी आणि सुरक्षा दलाने त्या भागाला वेढा घातला आणि शोध मोहीम राबविली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. यावर सुरक्षा दलाने चौख प्रत्युत्तर दिलं आणि चकमकीला सुरुवात झाली.