जम्मू-कश्मीर: श्रीनगर येथे दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, 7 जण गंभीर जखमी
Indian Army (Photo Credits-File Photo)

जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधील श्रीनगर (Srinagar) येथे कडक सुरक्षा असून सुद्धा हरि सिंह हाइट स्ट्रीट जवळ दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये 7 जण गंभीर झाले आहे. घडवून आणलेला हल्ला जेव्हा घडला ज्या वेळेस घाटीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था आणि जागोजागी जवांनांना तैनात करण्यात आले आहे. गंभीर जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ग्रेनेड हल्ला झाल्यानंतर पुन्हा सुरक्षितेत अधिक वाढ करण्यात आली आहे. घटनास्थळी जम्मू-कश्मीर मधील पोलिसांसोबत सुरक्षाबलाची टीम सुद्धा उपस्थित आहे. जवानांवर करण्यात आलेल्या ग्रेनेड हल्ल्याची आता तपासणी सुरु करण्यात आली असून अधिक माहिती मिळण्याची प्रतिक्षा केली जात आहे. जम्मू-कश्मीर येथून कलम 370 हटवल्यानंतर ही दगडफेकी करण्याची कारस्थाने थांबलेली नाहीत. 5 ऑगस्ट पासून ते आतापर्यंत जम्मू-कश्मीर येथे 300 पेक्षा अधिक वेळा दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान सुरक्षाबलाकडून सातत्याने घाटी येथे परिस्थिती सामान्य असल्याचा दावा केला जात आहे.(Jammu Kashmir मधील मोबाइल Post Paid सेवा सोमवारपासून पुन्हा सुरु; इंटरनेटच्या वापरावरील बंदी अजूनही कायम)

यापूर्वी सुद्धा जम्मू-कश्मीर मधील अवंतीपुरा येथे मंगळवारी सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले होते. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख लश्कर ए तैयबा मधील अबु मुस्लिम नावाचे पटली आहे. त्याचसोबत घाटीमध्ये दहशतवादी सक्रीय असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळेच जवानांना हायअलर्टवर ठेवण्यात आले आहे.दहशतवादी अवंतीपुरा येथील स्थानिक होता. तर 4 जुलै 2018 मध्ये त्याने दहशवादी संघटनेसोबत हातमिळवणी केली होती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अबु मुस्लिम अवंतीपोरा पोलीस स्टेशन आणि मालनपोरा येथील एअरबेस जवळ दहशतवाद्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देत होता.