Pranab Mukherjee Last Rites At Funeral (Photo Credits: ANI)

Pranab Mukherjee Last Rites: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांंचे काल प्रदीर्घ आजारानंंतर दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटल (Army Hospital) मध्ये निधन झाले. आज दिल्लीच्या लोधी स्मशानघाटात त्यांंच्या पार्थिवावर पुत्र अभिजीत मुखर्जी (Abhijeet Mukherjee) यांंच्या हस्ते अंत्यसंस्कार करण्यात आले व त्यानंंतर त्यांंना पुर्ण शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. प्रणब मुखर्जी यांंना कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे अंत्यसंस्कारांच्या वेळी सोशल डिस्टंंसिंगचे (Social Distancing)  काटेकोरपणे पालन करण्यात आले होते, कोरोना रुग्णांंच्या (Coronavirus) मृतदेहावर अंत्यसंस्कार करायच्या नियमांंनुसारच सर्व विधी स्मशानघाटात अगदी मोजक्याच उपस्थितीत पार पडल्या.  प्रणब मुखर्जींंच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, NCP अध्यक्ष शरद पवार, सह अनेक मान्यवरांनी व्यक्त केला शोक

आज सकाळी प्रणब मुखर्जी यांंचे पार्थिव दिल्लीतील राजाजी मार्ग वरील निवासस्थानी आणण्यात आले होते यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंंद, पंंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांंधी यांंच्यासह अनेक नेत्यांंनी अंत्यदर्शन घेतले होते. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने जाहीर केला 7 दिवसांचा दुखवटा

ANI ट्विट

दरम्यान, भारताचे 13 वे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांंच्या मेंदूत गाठ झाल्याने त्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. या गुंतागुंतीत त्यांची तब्येत खालावली. ते कोमामध्ये गेले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले होते. व्हेंटिलेटरवर असलेल्या प्रणब मुखर्जी यांची अखेर काल संध्याकाळी प्राणज्योत मालवली.