Former President Pranab Mukherjee | File Image | (Photo Credits: PTI)

Govt Announces 7 Day State Mourning: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Former President Pranab Mukherjee) यांचे 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने 7 दिवसांच्या दुखवट्याची घोषणा (Govt Announces 7 Day State Mourning) केली आहे. प्रणव मुखर्जी यांच्यावर 10 ऑगस्ट रोजी मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळीचं त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं.

प्रणव मुखर्जी यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांना नवी दिल्लीतल्या लष्कराच्या आर अॅंड आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अशातचं कोरोनाची लागण झाल्याने त्यांना त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. (हेही वाचा - Former President Pranab Mukherjee Passes Away: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी व्यक्त केला शोक)

दरम्यान, 10 ऑगस्ट रोजी प्रणव मुखर्जी यांनी ट्विट करून आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती दिली होती. प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धाजंली अर्पण केली. भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी भारताच्या विकासावर ठसा निर्माण केला. समाजाच्या सर्वच स्तरांमधून तसेच सर्व राजकीय विचारांच्या गटांसाठी ते सन्मान्य व्यक्ती होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली.