File image of Congress leader Rahul Gandhi | (Photo Credits: IANS)

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी शनिवारी 16 मे रोजी ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेज सहित सध्या देशातील परिस्थिती बाबत भाष्य केले. राहुल यांनी यावेळी सरकारने 20 लाख कोटींच्या पॅकेजवर विचार केला पाहिजे आणि कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट आणि लॉकडाऊन (Lockdown) मुळे पीडित लोकांच्या बँक खात्यात थेट जायला हवेत. "आज गरीब जनतेला पैशांची गरज आहे. ही बाब लक्षात घेत निधीचे 200 दिवसांसाठी थेट बँक हस्तांतरण, मनरेगा (MGNREGA) अंतर्गत शेतकऱ्यांना थेट पैसे मिळावेत अशी सोय करण्यात यावी कारण हे लोक आपले भविष्य आहेत. अशा शब्दात राहुल यांनी मोदींना सल्ला दिला आहे. Atma Nirbhar Bharat Abhiyan अंतर्गत जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेज संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारमण देणार अधिक माहिती; आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद

राहुल गांधी यांनी पुढे म्हंटले की, थेट पैसे न देण्यामागील कारण म्हणजे रेटिंग्ज. जर आपण आज आपल्या आर्थिक व्यवहारातील तूट वाढविली तर परदेशी एजन्सीज आपल्या देशाची रेटिंग खाली आणतील, याच भीतीने थेट पैसे दिले जात नाहीयेत. मात्र लोकांना थेट त्यांच्या खिशात पैसे देणे आणि कर्जमुक्त असणे ही काळाची गरज आहे. जेव्हा मुले संकटात असतात तेव्हा आई त्यांना कर्ज नाही आराम देते. त्यामुळे हे पॅकेज लोकांना कर्ज देणारे नव्हे तर मदत देणारे हवे.

ANI ट्विट

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर रघुराम राजन यांच्या सोबत ऑनलाईन चर्चा केल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या काही सूचनांचा या पॅकेज मध्ये विचार करण्यात आला आहे उर्वरित सूचना सुद्धा लक्षात घेतल्या जाव्यात यासाठी आता पक्ष शांततेने दबाव आणणार आहे असेही राहुल यांनी सांगितले. हा काळ दुसऱ्यांवर आरोप करण्यासाठी नाही तर काम करण्याचा आहे असे म्हणत राहुल यांनी आपले मत मांडले.