Petrol, Diesel Prices Today: मुंबई, दिल्ली, चेन्नई शहरांसह जाणून घ्या भारतातील आजचे पेट्रोल, डिझेल दर
Petrol-Diesel Price | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

देशातील पेट्रोल आणि डिझेल दर (Petrol, Diesel Prices) पुन्हा एकदा वाढले आहेत. सलग दोन दिवस स्थिर राहील्यानंतर पुन्हा एकदा देशातील पेट्रोल, डिझेल दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली. पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) आज पुन्हा एकदा अनुक्रमे 58 पैसे, 35 पैशांनी वाढले. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आज 107.94 रुपये प्रति लीटर तर डीजल 96.67 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. मुंबईमध्ये हेच दर प्रति लीटर - मुंबईत रु. 113.80 आणि 104.75 रु., कोलकाता मध्ये रु. 108.45 आणि रु. 99.78; चेन्नई मध्ये अनुक्रमे रु. 104.83 आणि रु 100.92 इतके आहेत.

देशातील प्रत्येक पेट्रल पंपावर दररोज सकाळी 6 वाजता नवे दर लागू होतात. कारण प्रत्येक ठिकाणचे स्थानिक महसूली कर वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यात अनेकदा पेट्रोल डिझेल तर वेगवेगळे असू शकतात. आपण पेट्रोल-डिझेलचे आपल्या प्रदेशातील दर SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला इंडियन ऑयल SMS सेवेच्या माध्यमातून मोबाइल नंबर 9224992249 वर SMS पाठवू शकता. त्यासाठी आपला मेसेज असा लिहायला हवा. RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलर कोड. आपल्या परिसरातील RSP साईटवर जाऊन तपासू शकता. हा मेसेज पाठवल्यानंतर काही सेकंदात आपल्या फोनवर ताजे पेट्रोल, डिझेल दर उपलब्ध होऊ शकतात. (हेही वाचा, SGB Scheme 2021: सॉवरेन गोल्ड बॉन्ड 2021 च्या 7व्या सीरीजला सुरूवात; प्रति ग्राम 4765 रूपयात करू शकता गुंतवणूक)

ट्विट

पेट्रोल, डिझेल दारावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नेहमीच सामना रंगलेला पाहायला मिळतो. पेट्रोल डिझेल दर आणि महागाई यांचा अत्यंत घनिष्ट संबंध असतो. त्यामुळे विरोधक महागाईच्या मुद्यावरून सरकारला घेरतात. प्रमाणाबाहेर टीका होऊ नये यासाठी सत्ताधारी कायम सावध असलेले पहायला मिळतात. या सगळ्यात सर्वसामान्य जनतेची अपेक्षा इतकीच की काहीही करा परंतु इंधन दर मर्यादित ठेवा. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मध्यंतरी म्हटले होते की, इंधन दर कमी करण्याचे सध्या कोणताही विचार नाही. काँग्रेसच्या धोरणामुळे हे दर वाढत असल्याचे सीतारामन यांचे म्हणणे आहे.