
दिवाळीचा सण आला की सोनं खरेदीला सुरूवात होते. तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर सोन्यामध्ये गुंतवणूकीसाठी आता भारत सरकार कडून देखील खास योजना राबवल्या जातात. सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond) ही त्यापैकीच एक आहे. सध्या सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या सातव्या सीरीजला सुरूवात झाली आहे. भारत सरकार कडून आरबीआय (RBI) ही सोन्यातील गुंतवणूकीची योजना राबवते. यामध्ये गुंतवणूकदारांना प्रति वर्षाला 2.50 % निश्चित दराने व्याज दिले जाणार आहे. तसेच ते नॉमिनल व्हॅल्यूच्या आधारे सहा महिन्यांनी दिले जातात.
अर्थ मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या नव्या सीरीज मध्ये 25-29 ऑक्टोबर 2021 मध्ये प्रति ग्राम 4765 रूपये या दरात ते विक्रीसाठी उपलब्ध असेल. तुम्ही ऑनलाईन पेमेंट केले असल्यास 50 रूपयांची सूट दिली जाणार आहे. हे गोल्ड बॉन्ड्स 8 वर्षांच्या कालावधीसाठी असतात. 5 वर्षांनंतर त्यामध्ये एक्झिटचा पर्याय आहे. हे गोल्ड बॉन्ड सेकेंडरी मार्केट्स मध्ये उपलब्ध असतात. गुंतवणूकदारांना किमान 1 ग्राम ते 4 किलो पर्यंत सोनं खरेदी करण्याची मुभा आहे. तर ट्र्स्टसाठी सोनं खरेदीची कमाल मर्यादा 20 किलो पर्यंत आहे. गुंतवणूकदारांना गोल्ड बॉन्ड्स हे बॅंकेच्या माध्यमातूनदेखील विकण्याची मुभा आहे. यासोबत SHCIL, पोस्ट ऑफिस, स्टॉक एक्सचेंज यांच्यामाध्यामातून देखील ते विकले जाऊ शकतात. नक्की वाचा: Hallmarking of Gold Jewellery: सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग 15 जून 2021 पासून सुरू होणार .
भारतामध्ये आता फिजिकल गोल्डची वाढती मागणी पाहता सरकारने गोल्ड बॉन्ड्स जाहीर केले आहेत. दर महिन्यात विशिष्ट दरामध्ये आणि ठराविक काळासाठी हे गोल्ड बॉन्ड्स उपलब्ध करून देले जातात. गुंतवणूक म्हणून तुम्ही सोन्याकडे पाहत असाल तर हाा एक चांगला पर्याय आहे.