
भारतामध्ये मागील दोन दिवस स्थिर असलेले इंधनाचे दर (Fuel Rates) आता पुन्हा वाढले आहे. आज (4 जून ) दिवशी राज्यात 4 मे पासून 18 व्या वेळेस ही इंधन दरवाढ नोंदवण्यात आली आहे. आज देशभर पेट्रोलच्या (Petrol Price) किंमतीमध्ये 27 पैसे तर डिझेलच्या किंमतीमध्ये (Diesel Price) 28 पैसे वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली, चैन्नई, कोलकाता मध्ये पुन्हा इंधन दरावाढीचा भडका उडाला आहे.
मुंबई मध्ये आज पेट्रोलच्या दरात 26 पैशांनी वाढ होऊन ती प्रतिलीटर 100.98 रूपये झाली आहे तर डिझेलचे दर 30 पैशांनी वाढून 92.99 रूपये झाले आहेत. मुंबई प्रमाणेच कोलकाता मध्ये पेट्रोल 26 पैशांनी वाढलं आहे तर डिझेल 28 पैशांनी वधारलं आहे. चैन्नईमध्ये पेट्रोलने आतापर्यंत उच्चांकी 96.23 प्रतिलीटर असा दर गाठला आहे तर डिझेल 90.38 रूपये प्रतिलीटर आहे.
पहा मुंबई, चैन्नई, कोलकाता आणि दिल्ली शहरातील दर
दिल्ली- पेट्रोल प्रतिलीटर 94.76 रूपये, डिझेल प्रतिलीटर रूपये 86.66
कोलकाता- पेट्रोल प्रतिलीटर 94.76, डिझेल प्रतिलीटर रूपये 88.51
मुंबई- पेट्रोल प्रतिलीटर 100.98, डिझेल प्रतिलीटर रूपये 92.99
चैन्नई- पेट्रोल प्रतिलीटर 96.23, डिझेल प्रतिलीटर रूपये 90.38
इथे पहा महाराष्ट्रातील तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल, डिझेलचे दर काय?
आज ग्लोबल ऑईल मार्केट मध्ये Brent Crude oil futures प्रति बॅरेल $71.02 आहे. हे 29 सेंट्स किंवा 0.4 पर सेंट खाली उतरले आहेत. West Texas Intermediate (WTI) crude futures हे देखील 29 सेंट्स किंवा 0.4 पर सेंट खाली आल्याने प्रति बॅरेल $68.52 आहेत. यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे Brent crude oil मागील वर्षाच्या तुलनेत 36% वाढली आहे. बॅरेल मध्ये 70 डॉलर पेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे आता रिटेल ट्रान्सपोर्टटेशन इंधन दरामध्ये वाढ झाली आहे.