Pune Crime: पुण्यात पार्किंगच्या वादातून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. ही घटना संपुर्ण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या घटनेनंतर पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, महिलेच्या अंगावर ज्वलंत द्रव ओतल्याचं दिसत आहे आणि तीला पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुदैवाने महिलेने घरातून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींच्या शोधात आहे. (हेही वाचा- तरुणाने स्वत:ला पोलिस चौकीसमोर पेटवून घेतलं, अखेर मृत्यू, पुण्यात खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खराडी परिसरात एका महिलेचे पार्किंगवरून वाद झाले होता. हा वाद एका टोकाला पर्यंत पोहचला आहे. महिलेच्या गाडीची दहा ते पंधरा जणांनी मिळून गाडीची तोडफोड केली आहे. त्यानतंर गाडीच्या काच्या फोडल्या आहेत. दरम्यान पीडित महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, महिला वेळेच प्रसंगी घटनास्थळावरून पळाली आहे. पेट्रोल चारचाकी गाडीवर पडल्याने कारला आग लागली. ज्यात कारचे सीट जळून खाक झाले आहे. सुदैवाने महिलेचा जीव वाचला.
पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पुण्यातील धक्कदायक घटना#punenews pic.twitter.com/f5wms1TdQF
— Lokmat (@lokmat) February 19, 2024
हा संपुर्ण गैरप्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दहा ते पंधरा जण महिलेच्या राहत्या घराच्या येथे येतात. ही टोळी दुचाकीवरून येत असताना दिसते. सर्वाच्या हातात लाठ्या असल्याचे दिसते. गाडीची तोडफोड करत लगेच काही जण पळून जातात. एक जण महिलेच्या अंगावर पेट्रोल फेकतो आणि हातातील माचीस पेटवून ती महिलेच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात महिले घरातकडे वळते त्यामुळे घटनेत कारच्या सीटला आग लागते. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.