Pune Shocker: पुणे शहरात वाघोली पोलिस चौकीसमोर एका तरुणाने पेटवून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तरुणाने काही दिवसांपूर्वी पोलिस ठाण्या समोर पेट्रोल अंगावर टाकून स्वत:ला पेटवून घेतले होते. पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला होता. मयत तरुणाचे नाव रोहिदास अशोक जाधव (वय वर्ष ३२) असे आहे. त्याने १३ फेब्रुवारी रोजी पेटवून घेतलं होत.
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण करणाऱ्या पोलिसांनी काय कारवाई केली याची चौकशी साठी आलेल्या रोहिदासला पोलिसांनी वाईट वागणूक दिली असा आरोप करत त्याने १३ फेब्रुवारीला स्वत:ला पेटवून घेतलं होत. कारवाी करत नसल्याने पोलिसांचे नाव घेत या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी त्वरित सुर्या रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. हेही वाचा- विहिरीचे पाणी प्यायल्याने दलित मुलांना बेदम मारहाण
घटनेनंतर पोलिसांवर टीका करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दखल घेत लोणी कंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांची तात्काळ बदली केली होती. याच प्रकरणी दोन पोलिस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले होते. रोहितचा मृत्यू झाल्याने पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.