Hyderabad: हैदराबादमधील एका फळ विक्रेत्याने एका परदेशी व्लॉगरला फसवून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Hyderabad Viral Video)होत आहे. व्हिडिओमध्ये स्कॉटिश कंटेंट क्रिएटर ज्याचे नाव ह्यू आहे. त्याने फळ विक्रेत्याला केळीच्या किंमतीबद्दल विचारले, त्यावर केळी विक्रेत्याने एका केळीची किंमत 100 रुपये(Overpriced Banana) सांगितली. त्या व्लॉगरला सुरुवातीला वाटले की कदाचित विक्रेत्याला तो केळी मागत आहे हे समजले नसेल. त्याने पुन्हा एकदा विक्रेत्याला विचारले, पण पुन्हा त्याने एका केळीची किंमत 100 रुपयेच सांगितली.
हे ऐकून व्लॉगरला धक्का बसला आणि त्याने विक्रेत्याला परदेशी असल्यामुळे जास्त किंमत सांगत आहात का असे विचारले. त्यावर विक्रेता त्याच्या किंमतीवर ठाम राहिला. व्हिडिओमध्ये पुढे असे दिसून येते की, व्लॉगर विक्रेत्याला समजावून सांगतो की इतकी जास्त किंमत आकारल्याने तो ग्राहक गमावेल. असे असूनही, विक्रेत्याने त्याची किंमत कमी करण्यास नकार दिला. शेवटी व्लॉगर केळी न खरेदी करताच तिथून निघून गेला.
हैदराबादच्या रस्त्यावरील विक्रेत्याने परदेशी व्हीलॉगरला फसवण्याचा प्रयत्न केला
रेडी(ठेले) वाला एक केला 100 रु में बेच रहा है।
स्कॉटलैंड के कंटेंट क्रिएटर ह्यूग ने वीडियो बनाकर शेयर किया। pic.twitter.com/gmMgBXWKiY
— Abhimanyu Singh Journalist (@Abhimanyu1305) January 19, 2025
या घटनेनंतर, व्लॉगर म्हणाला की यूकेमध्ये एका पौंडला (सुमारे १०० रुपये) 8-10 केळी सहज खरेदी करता येतात. अशा परिस्थितीत, भारतासारख्या देशात जिथे फळे साधारणपणे स्वस्त असतात, तिथे केळीसाठी इतकी जास्त किंमत आकारणे आश्चर्यकारक आहे. त्या व्लॉगरने हा अनुभव त्याच्या फॉलोअर्ससोबत शेअर केला आणि म्हटले की कदाचित विक्रेत्याने तो परदेशी आहे म्हणून त्याच्याकडून इतकी जास्त किंमत आकारली.
रस्त्यावरील विक्रेत्यांकडून सावधगिरी बाळगण्याची गरज
हैदराबादसारख्या ठिकाणी, जिथे दररोज हजारो परदेशी पर्यटक भेट देतात, असे अनुभव सामान्य असू शकतात. पर्यटकांनी खरेदी करताना सावधगिरी बाळगावी आणि किंमती आधीच जाणून घ्याव्यात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.