Inter-Caste Marriages | Representational Image (Photo Credits: Pixabay)

आंतरजातीय विवाहांना (Inter-Caste Marriages) चालना देण्यासाठी आणि समाजातील जातीपाती तोडण्यासाठी मुख्यमंत्री नवीन पटनाईक (CM Naveen Patnaik ) यांच्या नेतृत्वाखाली ओडीशा राज्याने एक पाऊल पुढे टाकले आहे. ओडीशा सरकारने आंतरजातीय विवाहांना चालना देण्यासाठी एक स्वतंत्र वेब पोर्टल ( Sumangal Web Portal) लॉन्च केले आहे. तसेच, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी प्रोत्साह निधी वाढवून तो 2.5 लाख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विवाह केल्यानंतर अवघ्या 60 दिवसांमध्ये हा निधी जोडप्यांना दिला जाणार आहे.

एसटी व एससी विकास, अल्पसंख्यांक व मागासवर्गीय कल्याण कल्याण विभागाने विकसित केलेले हे पोर्टल मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले. 'सुमंगल' असे या पोर्टलचे नाव आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरुवातीला प्रोत्साहनपर 1 लाख रुपये इतका निधी देण्यात येत होता. आता त्यात पुन्हा वाढ करत तो 2.5 लाख इतका करण्यात आला आहे.या वेळी बोलताना नवीन पटनाईक म्हणाले की, अशा प्रकारच्या लग्नांमुळे सामाजिक समरसता होईल. (हेही वाचा, AIADMK Dalit MLA A Prabhu Marriage With Brahmin Girl: अन्नाद्रमुक आमदार ए. प्रभु यांचे ब्राह्मण मुलीसोबत लग्न, जातीयतेला मुठमाती देत 'आंतरजातीय विवाह')

दरम्यान, हे अनुदान (निधी) केवळ प्रथम विवाह करणाऱ्या लोकांनाच दिले जाईल. तसेच, हा निधी घेण्यासाठी वर आणि वधू हे दोघेही पहिल्यांदाच लग्न करणारे असायला हवेत. हा विवाह उच्च जातीचे हिंदू आणि अनुसूचित जातीतील हिंदू यांच्यात असले पाहिजे. हिंदु विवाह कायदा अधिनियम 1955 अन्वये हा विवाह कायद्यानुसार वैध असला पाहिजे . जोडप्यापैकी एक जोडीदार हा अनुसूचित जातींमधील आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 341 मधील तरतूदी पूर्ण करणारा असणे आवश्यक आहे.

दरम्यान, विवाहासाठी 2.5 लाख हे अनुदान केवळ प्रथमच विवाह करणाऱ्या लोकांना दिले जाईल. परंतू, वधू विधवा किंवा नववधू विधवा असतील तर त्यांना प्रोत्साहनपर निधी घेण्यास पात्र ठरेल. असा जोडप्यांना घर / जमीन खरेदी करण्यासाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी जमीन / आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जाईल.