Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

45 वर्षीय भारतीय आईची मुलं ऑस्ट्रेलियामध्ये दुरावल्याने प्रियदर्शनी पाटील नामक महिलेने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. प्रियदर्शनी ही मूळची कर्नाटकातील बेळगाव प्रांतातील आहे. तिथे इथेच आपल्या मूळ घरी आत्महत्या केली आहे. किशोरवयीन मुलगा आजारी पडल्याने ऑस्ट्रेलिया मधील प्रशासनाने 17 वर्षीय अमर्त्य आणि 13 वर्षीय अपराजिता या दोन्ही मुलांना त्यांच्या ताब्यात घेतलं. प्रियदर्शनी वारंवार मुलांचा ताबा मिळावा म्हणून प्रशासनाकडे मागणी करत होती पण ती मान्य होत नसल्याने तिने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे.

प्रियदर्शनी पाटील ही इंजिनियर होती. पती लिंगराज पाटील याच्यासोबत ती सिडनी मध्ये राहत होती. या जोडप्याला दोन मुलं आहे. त्यांची प्रकृती बिघडली आणि बघता बघता परिस्थिती हाताबाहेर गेली. डॉक्टरांविरूद्ध तक्रार करू न शकलेल्या प्रियदर्शनी च्या विरूद्ध ऑस्ट्रेलियन प्रशासनानेच कारवाई केली. मुलांचा नीट सांभाळ करू न शकल्याचा ठपका ठेवत स्थानिक child protection laws अंतर्गत तिच्यावर कारवाई झाली. पाच  वर्षांपासून प्रियदर्शनीची मुलं तिच्यापासून दूर नेण्यात आली आहेत. दरम्यान तिच्या सुसाईड नोट मध्ये तिने ऑस्ट्रेलियन सरकारमुळे आत्महत्या करत असल्याचं तिने लिहलं आहे.

बेंगलूरू मध्ये आल्यानंतर काही दिवसांतच आई प्रियदर्शनीने मलप्रभा नदी मध्ये उडी मारून जीव दिला. 19 ऑगस्टला तिने धारवाडला जाण्याचं तिकीटही काढलं होतं पण तिने प्रवास केलाच नाही. उलट तिने हुबळीची बस घेऊन तिचे दागिने आणि पैसे वडिलांच्या पत्त्यावर कुरियर केले.

प्रियदर्शनीचे नातेवाईक आणि माजी महापौर Iresh Anchatageri यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियदर्शनी आणि तिच्या नवर्‍याने भारतामध्ये नोकरी शोधली होती आणि ते इथे रहायला देखील येणार होते.