Nisarga Cyclone Live Satellite Map & Tracking: 'निसर्ग चक्रीवादळ' चा मार्ग, वेग, किनारपट्टीवरील लँडफॉल आणि पावसाचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
Satellite picture of cyclone Nisarga (Photo Credits: IMD)

Nisarga Cyclone  Update: आज 3 जुन रोजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळ  (Alibaug) निसर्ग चक्रीवादळ  (Cyclone Nisarga) धडक देण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर आज कोकणासह मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एनडीआरएफची (NDRF) पथक सज्ज आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये (Arabian Sea) उत्तर-ईशान्य दिशेने सरकत आहे आणि पुढे उत्तर महाराष्ट्र व त्यास लागून दक्षिण गुजरात किनारपट्टी ओलांडेल. सद्य घडीला निसर्ग चक्रीवादळाचा वेग किती आहे? वादळाचा मार्ग कोणता आहे? वादळ नेमकं केव्हा धडकणार आणि यामुळे पडणार्‍या पावसाचा अंदाज हे सर्व डिटेल्स सविस्तर जाणुन घेण्यासाठी खाली दिलेला Cyclone Nisarga Live Satellite Map and Tracking Map तपासुन पाहा

1961 नंतर महाराष्ट्र समुद्र किनाऱ्यावर धडकणारे हे पहिले चक्रीवादळ असणार आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळ लवकरच रौद्र रूप धारण करेल व त्याचे स्वरूप अजून वाढेल. आज दुपारी, हे वादळ महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवरील हरिहरेश्वर ते दमण दरम्यान पुढे सरकेल. हे चक्रीवादळ दोन राज्यांत जास्तीत जास्त 100-110 किमी ते 120 प्रतितास वाऱ्याच्या वेगाने धडकणार आहे. हे वादळ सध्या पणजीच्या पश्चिम-वायव्येस सुमारे 280 कि.मी वर, मुंबईच्या दक्षिण-नैऋत्येस 350 कि.मीवर, अलिबागच्या दक्षिण-नैऋत्येस 300 कि.मी. आणि सुरतच्या दक्षिण-नैऋत्येकडे 560 किमी. अंतरावर आहे.

Cyclone Nisarga Live Satellite Map: 

 

या चक्रीवादळामुळे रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळाची परिस्थिती पाहता, येत्या 48 तासांसाठी राज्यातील जनतेने घरातच राहण्याचे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राच्या काही भागात वीज पुरवठाही खंडित होऊ शकतो, असेही ठाकरे म्हणाले. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या किनारपट्टी भागात कलम 144 लागू करण्यात आला आहे आणि किनारपट्टी परिसरात नागरिकांना जाण्यास मनाई केली आहे. (हेही वाचा: 'निसर्ग 'चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर पालघर येथील समुद्र किनापरट्टीलगतच्या 13 गावांमधील नागरिकांना NDRF कडून हलवण्यात येणार)

Cyclone Nisarga Path Tracker:

या वादळाच्या संभाव्य धोक्याला लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारतर्फे सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे. नागरिकांना याबाबत सतर्क करण्यापासून ते अधिक धोका असणाऱ्या भागात एनडीआरएफच्या (NDRF)  तुकड्या सज्ज ठेवण्यापर्यंत सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आली आहे. लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.