राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच एनआयए (NIA) ने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांविरोधात बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA Act) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिम याच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास आता एलीट एजन्सी करणार आहे. सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाने या चौकशीसाठी मंजूरीही दिली आहे. एनआयएच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, एनआयएद्वारा दाखल एफआयआरमध्ये दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे.
एनआयएच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, प्रदीर्घ काळापासून दाऊद भारतात दहशतवादी कारवाया करत आहे. त्याला पाठिंबा देत आहे. त्याने हवालाच्या माध्यमातून भारताविरोधी कारवाई करणाऱ्या लोकांना दहशतवादी मदत पुरवली आहे. जे भारतातील शांतता भंग करण्यासाठी काम करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा आता दाऊद गँगवर बारीक नजर ठेऊन आहेत. तसेच, भारतात दंगलसदृश्य वातावरण अथवा अशांतता निर्माण व्हावी यासाठी अनेक लोकांची भरती केली आहे. तो राष्ट्रविरोधीत कारवायांना बळ देत आहे. तसेच, विविध धार्मिक समूहांमध्येही दरी निर्माण करण्याचे काम करत आहे. (हेही वाचा, रत्नागिरी: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या लोटे येथील जमिनीचा 1 डिसेंबरला होणार लिलाव)
एनआयएच्या अधिकाऱ्याने नाव न छपण्याच्या अटीवर सांगितले की, 'या आधीही भारतात झालेल्या अनेक देशविरोधीत कारवायांमध्ये दाऊदचा हात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. भारतात अशांतता निर्माण करण्यासाठी त्याने भरती केली आहे. अद्यापही तो हे करतो आहे. या बदल्यात या लोकांना तो आर्थिक पाठबळ देतो.' भारतविरोधी कारवायांसाठी लोकांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात असल्याचेही एनआयएच्या अधिकाऱ्यांचे म्हणने आहे. त्याच्या कारवायांवर केंद्रीय तपास यंत्रणा आता आणखी बारीक नजर ठेऊन असल्याचेही या अधिकाऱ्याने आयएनएसशी बोलताना सांगितले.