रत्नागिरी: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या लोटे येथील जमिनीचा 1 डिसेंबरला होणार लिलाव
दाऊद इब्राहिम (Photo Credits-Twitter)

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याने साठवलेल्या काळ्या पैशातून अनेक ठिकाणी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. मात्र सध्या त्याच्या देशातील संपत्तीचा लिलाव (Dawood Property Auction) होण्याचे सत्र सुरु आहे. अलीकडेच दाऊदच्या सहा जागांचा लिलाव झाला होता. त्यात आता आणखी एका जागेची भर पडली आहे ती म्हणजे रत्नागिरीतील लोटेतील जमीन. या जागेचा लिलाव येत्या 1 डिसेंबरला होणार आहे. TV9 Marathi ने याबाबतचे वृत्त दिले असून इथल्या जागेची स्मगलिंग आणि फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेट आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिका-यांकडून आज पाहणी करण्यात येणार आहे.

दाऊद इब्राहिम याने देशासह विदेशातही अनेक ठिकाणी प्रॉपर्टी करुन ठेवली आहे. मात्र त्याचा आता लिलाव सुरु झाला आहे. यात रत्नागिरीतील लोटे येथील जमिनीचा 1 डिसेंबरला लिलाव होणार आहे. लिलावात मालमत्तेची खरेदी केलेले सुप्रीम कोर्टाचे वकील भुपेंद्रकुमार भारद्वाजसुद्धा या जागेची पाहणी करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आता मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे.हेदेखील वाचा- Dawood Ibrahim Dead Or Alive: दाऊद इब्राहिम चे कोरोनामुळे निधन? सोशल मीडियावर पसरतायत तुफान अफवा, वाचा सविस्तर

दरम्यान दाऊदच्या दिल्लीच्या 2 वकिलांनी त्याच्या सहा मालमत्ता घेतल्या आहेत. यामधून सरकारला 22 लाख 79 हजार 600 रुपये मिळाले आहेत. दाऊदची रत्नागिरीतील हवेली अवघ्या 11 लाख 20 हजार रुपयांना विकण्यात आली आहे. सेफमा अर्थात स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्स एजन्सीकडून हा लिलाव झाला.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी दाऊदचा कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र डी-कंपनीचे अंडरवर्ल्ड ऑपरेशन सांभाळणारा दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम (Anis Ibrahim) याने दाऊदच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे म्हणत दाऊद आणि त्याचे पत्नी सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले