नव्या वर्षात शेअर मार्केट मध्ये 41 हजारांचा उच्चांक गाठलेला दिसून आला. BSE यांच्या सेनसेक्समध्ये जवळजवळ 15 टक्क्यांनी तेजी नोंदवण्यात आली आहे. तर काही दिग्गज शेअर्स कंपन्यांनी त्यांचे रिकोर्ड ब्रेक केले आहेत. नव्या सरकाने 5 जुलै रोजी बजेट सादर केल्यानंतर पहिल्यांदाच सेनसेक्सने 40 हजारांचा पल्ला गाठला आहे. यापूर्वी 4 जून 2019 ला सेनसेक्स 40,083 वर बंद झाला होता. यंदाच्या लोकसभा निवडणूकीवेळी सुद्धा सेनसेक्सने ऐतिहासिक स्तर पार केला होता. तज्ञांच्या मते पुढील वर्षात म्हणेच नव्या वर्षात (2020) तुम्ही शेअर्स खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तर तुम्हालाचा त्याचा फायदा होणार आहे. तर जाणून घ्या तुम्ही शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणूक करत असाल तर कोणत्या कंपनीचे शेअर्स तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील. त्यानुसार तुम्ही विचार करुन शेअर्स खरेदी करु शकता.
>>भारती एअरटेल:
CMP: ₹457.35
या वर्षातील बदल: 59.23%
टेलिकॉम कंपन्यांमधील त्यांचे टॅरिफ वॉर संपल्यानंतर एअरटेल कंपनीचे शेअर्सचा सेनसेक्स या वर्षात टॉप परफॉर्मर राहिले आहेत. क्रेडिट सुइस यांनी नुकतीच एक नोट लिहिली असून एअरटेल कंपनीच्या शेअर्सबाबत सकारात्मक भुमिका मांडली आहे. तर ब्लूमबर्ग डेटा यांच्या मते ही पुढील वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
>>ICICI बँक:
CMP: ₹541.04
या वर्षातील बदल: 50.29%
एलारा कॅपिटल यांच्या मते ICICI बँकेचे शेअर्स खरेदी करण्याच विचार करत असल्यास ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. कारण बँकेचे हाय एमपीएल आणि हाय क्रेडिट कॉस्टच्या कारणामुळे तुम्हाला यामधून भरपूर नफा होऊ शकता.(सर्वसामान्यांसाठी खूशखबर! आता खरेदी करा रेल्वे शेअर्स; IRCTC ने लॉंच केले IPO, समान्य गुंतवणूकदारांना सवलत, घ्या जाणून)
>>बजाज फाइनान्स:
CMP: ₹4138.35
या वर्षातील बदल: 56.69%
सर्वाधिक ग्रोथ आणि प्रॉफिटचा विचार करुन तुम्ही जर शेअर्स खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तर बजाज फायनान्स ही उत्तम कंपनी आहे. तर 2019 मध्ये बहुतांश गुंतवणूकदारांनी बजाज कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहे.
तर ऑक्टोबर महिन्यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांचे सेनसेक्समध्ये 122 अंकांनी वाढला असून 49,953 च्या घरात पोहचला आहे. व्यवहाराच्या दरम्यान सेनसेक्सने 40 हजाराचा आकडा पार केला आहे. सकाळी 10.55 मिनिटांनी सेनसेक्स 40,039 वर स्थिर झाला होता.