
मुंबई शेअर बाजारात ( Mumbai Stock Market) गुरुवारी (21 जानेवारी 2021) सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीची (Nifty) ऐतिहास कामगिरी पाहायला मिळाली. शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच BSE सेन्सेक्स 50,000 चा टप्पा ओलांडून पुढे गेला. बाजार नियामक सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) द्वारा फ्यूचर ग्रुपच्या रिटेल मालमत्ता खरेदीच्या 24,713 कोटी रुपयांच्या व्यवहाराला मा्यता दिली. त्यानंतर काही काळातच BSE Sensex ने गुरुवारी प्रथमच इतक्या उच्चांकावर उसळी घेतली. रिलायन्सचा हा करार थांबविण्याच्या अॅमेझॉनच्या प्रयत्नांना यश आले नाही.
शेअर बाजाराची आज सुरुवातच तेजीने झाली. त्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा BSE सेंसेक्स 304 अंकांनी वाढून तो 50,000 इतक्या अत्युच्च पातळीवर पोहोचला. या वळी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) चा निफ्टीही 86 अंकांनी उसळत तो 14,717.65 वर स्थिरावला. (हेही वाचा, अर्थसल्ला: स्टॉक मार्केटच्या तुलनेत म्युच्युअल फंडात गुंतवणूक किती सुरक्षित..?)
सेन्सेक्सने मागच्या 6 वर्ष 8 महिने 5 दिवसांमध्ये 25 हजार ते 50 हजार पर्यंत प्रवास केला आहे. दरम्यान, आज सकाळी 9.51 वाजेपर्यंत सेन्सेक्स 265 अंकांच्या तेजीसोबत 50,056.64 वर पोहोचला होता. दुसऱ्या बाजूला एशियाई बाजारही गुरुवारी नव्या उच्चांकावर पोहोचला. अमेरिकेमध्ये राष्ट्राद्यक्ष म्हणून जो बायडन यांचनी शपथ ग्रहण करताच शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली. कोरोना महामारीत अनेक लोक आर्थिक अडचणीत असताना सेन्सेक्सने मात्र उसळी घेतली आहे.