भारतीय रेल्वेने (Indian Railway) सामान्य नागरिकांसाठी गुंतवणुकीची एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन-आयआरसीटीसीचा (IRCTC) आयपीओ (IP0) आज, सोमवार, 30 सप्टेंबर रोजी उघडला आहे. आयआरसीटीसीचा हा आयपीओ 3 ऑक्टोबर 2019 रोजी बंद होईल. या आयपीओद्वारे केंद्र सरकार प्रत्येकी 10 रुपये मूल्याच्या 2,01,60,000 शेअर्सची विक्री करीत आहे. या समभागांपैकी 1.60 लाख शेअर्स कर्मचार्यांसाठी राखीव असतील. या आयपीओद्वारे केंद्र सरकारला 635-645 कोटी रुपये उभे करायचे आहेत. महत्वाचे म्हणजे या आयपीओमध्ये गुंतवणूकीसाठी किरकोळ गुंतवणूकदारांना प्रति शेअर 10 रुपये सूट मिळणार आहे.
सध्या आयआरसीटीसी तिकिट बुकिंग, हॉटेल बुकिंग, रेल्वे केटरिंग सर्व्हिस आणि पर्यटनाशी संबंधित काम पाहते, त्यामुळे सामान्य नागरिकांना रेल्वे शेअर्समध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे ठरू शकते. आयआरसीटीसीच्या आयपीओ किंमत बँड 315-320 रुपये निश्चित केली गेली आहे. त्याचवेळी या आयपीओसाठी किमान निविदा 40 समभागांकरिता मिळू शकेल. किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचार्यांना अंतिम ऑफर किंमतीत प्रति शेअर 10 रुपये सूट मिळेल. आयआरसीटीसीने आर्थिक वर्ष 2019 मध्ये 272.6 कोटी आणि आर्थिक वर्ष 2018 मध्ये 220.62 कोटी रुपयांचा नफा कमावला. कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष 2018 मधील 1,470.46 कोटी रुपयांवरून, 2019 मध्ये 1,867.88 कोटी रुपयांवर गेला आहे. (हेही वाचा: रेल्वे तिकिट रद्द केल्यास मिळणार रिफंड, पण 'हे' नियम लक्षात ठेवा)
ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने आयआरसीटीसीच्या आयपोओचा प्रस्ताव सेबीकडे (SEBI) पाठविला होता. आयपीओनंतर आयआरसीटीसीमधील केंद्र सरकारची हिस्सेदारी 12.5 टक्क्यांपर्यंत खाली येईल. आयआरसीटीसीचा व्यवसाय वर्ष 2019 मध्ये 1,899 कोटी रुपयांचा महसूल होता. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत हा महसूल सुमारे 25 टक्क्यांनी अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.
आयपीओमध्ये काही ठराविक रक्कम गुंतवणे गरजेचे आहे. इथे आपण एका शेअरवर बीड लावू शकत नाही. येथे अॅप्लिकेशन लॉट साइजनुसार असणार आहे. म्हणजेच आपल्याला कमीतकमी विशिष्ट संख्येच्या समभागांसाठी बोली लावावी लागेल. आयआरसीटीसीच्या आयपीओची किंमत बँड प्रति शेअर 315–320 रुपये आहे आणि त्यात 40 इक्विटी शेअर्सचे आकार आहेत. किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचार्यांना प्रति शेअर 10 रुपयांची सूट असली, त्यानुसार एका लॉटसाठी 12,200-12,400 रुपये रक्कम गुंतवावी लागेल.