रेल्वे तिकिट रद्द केल्यास मिळणार रिफंड, पण 'हे' नियम लक्षात ठेवा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आयआरसीटी (IRCTC)  भारतीय रेल्वेमध्ये खाण्यापिण्याच्या सोयीसुविधांपासून ते पर्यटन आणि ऑनलाईन तिकिट संचालनाचे सूत्र सांभाळण्याचे काम करते. त्याचसोबत तिकिट रद्द करण्याची सुविधासुद्धा आयआरसीटी कडून देण्यात येते. त्यामुळे जर तुम्ही रेल्वे तिकिट काही कारणामुळे रद्द केल्यास त्याचे रिफंड तुम्हाला मिळू शकणार आहे. मात्र आयआरसीटीची वेबसाईट irctc.co.in अनुसार सामान्य प्रवाशांसाठी एक पत्रक जाहीर केल्यानंतर आता ई-तिकिट रद्द केले जाऊ शकत नाही असे सांगितले होते.

या स्थितीत प्रवाशांना ऑनलाईन TDR फायलिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता. त्याचसोबत पैसे रिफंड मिळण्याची प्रक्रिया तुम्हाला ट्रॅक करता येणार आहे. ट्रेनची तिकिट तुम्ही रिझर्वेशन काउंटर येथून रद्द करु शकता. परंतु जर तुम्ही ऑनलाईन तिकिट खरेदी केले असल्यास आयआरसीटीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलेले तिकिट रद्द करु शकणार आहात.

तर तिकिट रद्द करण्यासाठी हे नियम जरुर लक्षात ठेवा:

>मात्र आयआरसीटीसी यांच्या वेबसाईटनुसार जर ट्रेनचे तिकिट 48 तासांच्या आधी आरक्षित म्हणून देण्यात येत असल्यास तुम्हाला ते रद्द करायचे झाल्यास एसी प्रथम श्रेणी/एग्झिक्युटिव्ह क्लाससाठी 240 रुपये प्रति प्रवासी असा रिफंड देण्यात येतो. तर एसी 2 टियरसाठी 200 रुपये आणि एसी 3 टियर/एसी चेयर कार/एसी 3 इकोनॉमीसाठी 180 रुपये रिफंड देण्यात येतात.

>जर ट्रेनच्या वेळेपूर्वी 48 तासांपासून ते 12 तासांपूर्वी तुम्ही तिकिट रद्द करत असाल तर तुम्हाला 25 टक्के रद्द शुल्क लावण्यात येतो.

>ट्रेनच्या निर्धारित प्रस्थानापासून 12 तासांपेक्षा कमी आणि चार तास पूर्वी तिकिट रद्द केल्यास तिकिटावरील 50 टक्के रक्कम रद्द केल्याचे घेतले जातात.

>RAC तिकिट ट्रेन निघण्यापूर्वी 30 मिनिटे आधी रद्द करु शकता. ई-आरएसी तिकिट असून त्याचासाठी पत्रक बनवण्यात आले आहे. त्यामध्ये रिफंड मिळण्यासाठी ऑनलाईन टीडीआर भरावा लागतो.

>IRCTC आरक्षित तत्काळ तिकिट रद्द केल्यास त्याचे पैसे रिफंड म्हणून देण्यात येत नाहीत. आयआरसीटीसी यांच्या वेबसाईटनुसार, आकस्मिक तिकिट आणि प्रतिक्षा सूचीसाठी तत्काळ तिकिट रद्द करण्यासाठी रेल्वे नियमांनुसार शुल्क घेतले जातात.

त्यामुळे प्रवाशांनी ट्रेनचे तिकिट रद्द करण्यापूर्वी हे नियम लक्षात ठेवावे. तसेच प्रवाशांना ट्रेन तिकिट बुकिंग किंवा त्या संबंधित अधिक माहिती हवी असल्यास त्यांना ती आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.