
पश्चिम रेल्वेवर 56 तासाच्या जम्बो मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. सूरत यार्डात इंटरलॉकिंगच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर आज, 26 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. एकूण 56 तासांचा हा ब्लॉक आहे. या ब्लॉकच्या कालावधीत सूरत आणि उधनादरम्यान तिसरी मार्गिका जोडण्याचे काम करण्यात येईल. या ब्लॉकमुळं अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक ट्रेन अंशतः रद्द, तर काही अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहेत. यामुळे जर तुम्ही येत्या दोन दिवसात रेल्वे प्रवासाचा विचार करत असाल तर रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर करण्याचा विचार करण्याचे आवाहन हे करण्यात आले आहे. (हेही वाचा - Mumbai Local Mega Block: मुंबई लोकल वर 27 ऑगस्टला मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक; जाणून घ्या वेळा)
तिसरी मार्गिका सुरू झाल्याने सूरत-उधना दरम्यान दिल्ली-मुंबईच्या दोन्ही अप आणि डाउन मेन लाइनवरील एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक सुरुळीत होईल. जवळपास 40 एक्स्प्रेस पॅसेंजर ट्रेन सूरत-उधना दरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेवर वळवण्यात येतील, असे सांगितले जाते. पश्चिम रेल्वेने 26 ते 28 ऑगस्ट या 56 तासांच्या ब्लॉकच्या कालावधीत 48 लांबपल्ल्याच्या ट्रेन रद्द केल्या आहेत. तर 26 ट्रेन अंशतः रद्द किंवा शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. 2 ट्रेन अन्य मार्गावरून वळवल्या आहेत.
ब्लॉकच्या कालावधीत सर्वाधिक राजस्थानला जाणाऱ्या ट्रेन रद्द होणार आहेत. दादर-अजमेर, दादर-बिकानेर, दादर-भूज, वांद्रे-जयपूर, मुंबई- इंदूर, मुंबई-दिल्ली या ट्रेन रद्द करण्यात येतील.