मोदी सरकार (Modi Government) कर्मचाऱ्यांना एक मोठ गिफ्ट देण्याची तयारी करत आहे. त्यानुसार New Job Code मध्ये येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांना एका आठवड्यात फक्त चार दिवसच काम करावे लागणार आहे. तर तीन दिवस सुट्टी दिली जाणार आहे, खरंतर श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून लेबर कायद्याला आगामी दिवसात हिरवा झेंडा दाखवू शकतात.(7th Pay Commission: सरकार कर्मचार्यांना आणि पेन्शनधारकांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; जाणून घ्या कसा मिळणार फायदा)
केंद्र सरकार कंपन्यांची वागणूक लक्षात घेता येणाऱ्या काळात आठवड्यातील चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी देऊ शकते. परंतु या वेळी कर्मचाऱ्यांना मोठ्या शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. रिपोर्ट मध्ये असे म्हटले जात आहे की, श्रम मंत्रालय एप्रिल महिन्यात हा नियम लागू करण्याची रणनिती तयार करत आहे.(Ujjwala Yojana: LPG Gas कनेक्शनसाठी सरकार देत आहे 1600 रुपये; तुम्हीही घेऊ शकता फायदा, जाणून घ्या कुठे व कसे करा अप्लाय)
केंद्राकडून आठवड्याील चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टीचा ऑप्शन कंपन्या आणि संसथांना देऊ शकतात. त्याचसोबत तो मान्य किंवा रद्द करण्याचा निर्णय केंद्राकडून घेतला जाणार आहे. असे म्हटले जात आहे की, ज्या कंपनीला हे मान्य असेल त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांकडून आठवड्यातील चार दिवस रोज 12 तास काम करुन घ्यावे लागणार आहे. तर उर्वरित दिवशी सुट्टी मिळणार आहे.