LPG | (Photo Credits: All India Radio News, Facebook)

1 फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक कोटी नवीन गॅस कनेक्शन (Gas Connections) देण्याची घोषणा केली आहे. उज्ज्वला योजनेत (Ujjwala Yojana) ही गॅस जोडणी दिली जातील. या योजनेचा विस्तार करण्याबाबत सरकार भाष्य केले आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना एलपीजी कनेक्शन देण्यात येत आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना सरकार आर्थिक मदत करते. यामध्ये शासन 1600 रुपये देते. हे पैसे एलपीजी गॅस कनेक्शन खरेदी करण्यासाठी देण्यात येत आहेत. यासह, शेगडी खरेदी करण्यासाठी आणि एलपीजी सिलिंडर पहिल्यांदा भरण्यात येणाऱ्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी ईएमआय देखील प्रदान करता येतो.

असे करा अप्लाय -

कागदपत्रे -

या योजनेचा लाभ घेण्यासाठी बीपीएल कार्ड, बीपीएल रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्डची प्रत, राजपत्रित अधिकाऱ्यांनी पडताळणी केलेले स्वत: ची जाहीर पत्र, एलआयसी पॉलिसी, बँक स्टेटमेंट, बीपीएल यादीमधील नेम प्रिंटआउट अशी कागदपत्रे गरजेची आहेत.

कोण अर्ज करू शकेल -

  • या योजनेसाठी फक्त कुटुंबातील महिलाच अर्ज करू शकते.
  • अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे.
  • अर्जदार कुटुंब दारिद्र्य रेषेच्या खालील असावे.
  • अर्जदाराचे कोणत्याही बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या नावे आधीच एलपीजी गॅस कनेक्शन असू नये.