Photo Credit- X

Mehul Choksi-PNB Scam Case: पीबीएन घोटाळा प्रकरणात, मुंबईच्या विशेष न्यायालयाने फरार उद्योगपती मेहुल चोक्सीची 2565 कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता विकण्यास परवानगी दिली आहे. मेहुल चोक्सीची (Mehul Choksi) मालमत्ता विकून घोटाळ्यात बाधित (PNB Scam Case)झालेल्या लोकांना पैसे परत केले जातील. ईडी बराच काळ न्यायालयात हा प्रयत्न करत होती. मनी लाँड्रिंगच्या तपासादरम्यान ईडीने माहुल चोक्सीची मालमत्ता जप्त केली होती. (Mehul Choksi PNB Scam: पीएनबी घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोकसी याला भारतात खरोखरच आणता येईल?)

पीडित बँका आणि ईडीच्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. आतापर्यंत गीतांजली जेम्स लिमिटेडशी संबंधित अनेक मालमत्ता विकून 125 कोटी रुपये लोकांना परत केले आहेत. यामध्ये मुंबईतील फ्लॅट, दोन कारखाने आणि गोदामांचा समावेश होता. चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी हे 2018 मध्ये उघडकीस आलेल्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. (PNB Scam: DHFL चा पीएनबी बँकेत 3,688.58 कोटी रुपयांचा घोटाळा; बँकेने RBI कडे सोपवला अहवाल)

फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेन्डर्स ॲक्टनुसार, भारतातील कोणत्याही न्यायालयाने सूचीबद्ध गुन्ह्यासाठी वॉरंट जारी केलेल्या आणि ज्या व्यक्तीने "फौजदारी खटला टाळण्यासाठी देश सोडला आहे किंवा परदेशात राहतो, अशा कोणत्याही व्यक्तीवर फौजदारी खटला चालवण्याची शक्यता आहे" देशात परत येण्यास नकार दिला तर त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले जाऊ शकते.

मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी पीएनबीच्या काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने 13,400 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ईडी आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) त्याच्या मागावर आहेत. नीरव मोदीला आधीच फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले असून तो 2019 पासून लंडन तुरुंगात आहे.