नवी दिल्ली (New Delhi) येथील शाहीन बाग (Shaheen Bagh) परिसरात ज्या ठिकाणी नागरिकता कायदा म्हणजेच सीएए (CAA) विरोधात आंदोलन केले त्याच ठिकाणी आता अतिक्रमण हटविण्यासाठी दक्षिण दिल्ली नगर निगम (SDMC)कारवाई करत आहे. कारवाईसाठी बुलडोजर परिसरात पोहोचला आहे. पुढच्या काहीवेळातच अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली जाणार आहे. अतिक्रमणानंतर निर्माण होणारे मातीचे ढीग आणि राडाडोडा हटविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डंपरही मागविण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, MCD चे अतिक्रमण विभागाचे कर्मचारीही संबंधित ठिकाणी पोहोचले आहेत. निगमच्या कर्मचाऱ्यांनी हाताला लाल रंगाची रिबीन बांधली आहे. ज्यामुळे त्यांची ओळख पटणे सोपे जावे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे अतिक्रमण हटविण्याचा तीव्र विरोध केला आहे. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी हटवले आहे. ( हेही वाचा, Jahangirpuri Violence Case: जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणात मोठी कारवाई, 5 आरोपींवर NSA)
दिल्ली: शाहीनबाग इलाके में MCD द्वारा अतिक्रमण के खिलाफ कार्रवाई के विरोध में लोग सड़क पर प्रदर्शन कर रहे हैं। लोगों ने बुलडोजर को सड़क पर ही रोक दिया गया है। पर्याप्त सुरक्षा बल मौके पर मौजूद है। pic.twitter.com/9bSBrOBPRn
— ANI_HindiNews (@AHindinews) May 9, 2022
काही दिवसांपूर्वीच दक्षिण निगम येथील स्थायी समितीचे उपाध्यक्ष राजपाल सिंह यांनी म्हटले होते की, SDMC दक्षिणी दिल्ली च्या काही भागात 4 मेत ते 13 मे पर्यंत अवैध बांधकाम हटविण्यासाठी मोहीम सुरु करण्यात येईल. या संबंधात SDMC दक्षिण आणि दक्षिण पूर्व DCP यांना त्यांनी पत्रही लिहिले होते.