Maya Shankar Pathak beaten up for harassing girl (Photo Credits: YouTube)

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) वाराणसी (Varanasi) येथील भाजपच्या माजी आमदारास नागरिकांनी चोप दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. माया शंकर पाठक (Maya Shankar Pathak) असे आमदाराचे नाव आहे. महाविद्यालयीन तरुणीसोबत छेडछाड आणि अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी संतप्त आमदारांनी माया शंकर पाठक (Maya Shankar Pathak Viral Video) यांना फटकावल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण वाराणसी येथील चौबेपूर पोलीस स्टेशन हद्दीतील भगतुआ गावातील आहे. विशेष म्हणजे ज्या विद्यालयातील विद्यार्थिनीसोबत हा प्रकार घडला त्या कॉलेजचे माया शंकर पाठक हे चेअरमन आहेत.

पीडित विद्यार्थीनिच्या आरोपांची माहिती कळताच तिचे कुटुंबीय संतप्त झाले. पीडितेच्या कुटुंबीयांनी थेट पीडितेचे महाविद्यालय गाटले. तेथे जाऊन त्यांनी भाजपचे माजी आमदार आणि संबंधित महाविद्यालयाचे चेअरमन माया शंकर पाठक यांना संस्थेच्या कार्यालयातच चोप दिला. या घटनेचा व्हिडिओही बनविण्यात आला. याच व्हिडिओत माया शंकर पाठक कान पकडून माफी मागतानाही दिसत आहेत. पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे. (हेही वाचा, धक्कादाक! राजस्थान मध्ये अल्पवयीन मुलीशी छेडछाड करणा-या तरुणास लोकांनी मानवाची विष्ठा खाण्यासाठी केली जबरदस्ती, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल)

माया शंकर पाठक हे एकेकाळी भाजप तिकीटावर आमदार म्हणून 1991 मध्ये निवडूण आले आहेत. सध्या ते आमदार नाहीत परंतू, एमपी इंस्टीट्यूट एंड कंप्यूटर कॉलेज नावाने एक शिक्षणसंस्था भगतुआ गावात चालवत आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा आहे. आरोप आहे की माया शंकर पाठक यांनी पीडित विद्यार्थिनीला आपल्या कार्यालयात बोलवून तिच्यासोबत अश्लिल वर्तन केले.

विद्यालयात घडलेली घटना पीडितेने घरी जाऊन आपल्या कुटुंबीयांना सांगितली. घडला प्रकार ऐकून पीडितेचे कुटुंबीय महाविद्यालयात आले. त्यांनी माया प्रसाद पाठक यांना त्यांच्याच कार्यालयात चोप दिला. त्यानंतर मायाप्रसाद यांना कार्यालयातून बाहेर आणण्यात आले. व्हिडिओत दिसते आहे की संस्थेच्या आवरातच माया प्रसाद पाठकांना एका खुर्चीवर बसवून फटके दिले जात आहेत. तर माया प्रसाद आपले स्वत:चे कान पकडून माफी मागत आहेत.

दरम्यान, दोन्ही बाजूकडील कोणीही पोलिसांत तक्रार दिली नाही. परंतू, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आणि प्रकरण हायप्रोफाईल असल्याने पोलिसांनी स्वत:हूनच प्रकरणाची दखल घेतली आहे. क्षेत्रअधिकारी अभिषेक कुमार पांडे यांनीही म्हटले आहे की, या प्रकरणात अद्याप कोणीही तक्रार दिली नाही.