धक्कादाक! राजस्थान मध्ये अल्पवयीन मुलीशी छेडछाड करणा-या तरुणास लोकांनी मानवाची विष्ठा खाण्यासाठी केली जबरदस्ती, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
Representational Image | (Photo Credits: PTI)

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देशात कायदे कडक होत असताना देखील महिलांचा विनयभंग (Girl Molestation) करणे, त्यांची छेडछाड करणे, बलात्कार करणे यांसारख्या घटना कानावर सतत ऐकायला मिळतात. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी स्वत:च या गुन्हेगारास शिक्षा देण्यास सुरुवात केली आहे. असे घृणास्पद प्रकार करणा-या तरुणास मारहाण करणे यांसारखे सर्रास प्रकार होताना दिसतात. मात्र राजस्थानमध्ये (Rajasthan) एक विचित्रच प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करणा-या नराधमास तेथील नागरिकांनी माणसाची विष्ठा खाण्यास जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

रिपोर्टनुसार, राजस्थानच्या धौलपुर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीशी छेडछाड करणा-या तरुणास तेथील नागरिकांनी मारहाण केली. त्यानंतर त्याला माणसाची विष्ठा खाण्यास बळजबरी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.हेदेखील वाचा- Girl Harassed on Mumbai Local Train: धक्कादायक! तरुणीचा विनयभंग करून धावत्या लोकलमधून बाहेर फेकण्याचा प्रयत्न; एकाला अटक

या व्हिडिओमध्ये त्या तरुणास थोबाडात मारून तेथील लोक त्याला विष्ठा खाण्यास जबरदस्ती करत असल्याचे दिसत आहे. बसेरी पोलिस स्टेशनात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलिस स्टेशनचे अधिकारी एस एच ओ बॅन सिह यांनी सांगितले की, "त्या तरुणास पीडित मुलीच्या कुटूंबातील सदस्यांनी ताब्यात घेतले आणि त्याला मारहाण केली आणि विष्ठा खाण्यास सांगितली." या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एक मुलीची छेडछाड करणा-या आरोपीविरोधात आणि दुसरी त्याला मारहाण करणा-या 7 लोकांवर.

आरोपीच्या कुटूंबियांनी सांगितले की, त्या तरुणास कोणीतरी तिकडे बोलावले आणि 7-8 लोकांनी त्याला मारहाण केली. यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आली असून या सर्वांचा शोध सुरु आहे.