गॅस टँकर स्फोट (Photo Credit : ANI)

दिल्ली आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या यमुना एक्सप्रेस वेवर आज पहाटेच्या सुमारास गॅस टँकरचा स्फोट झाला. एका गॅस टँकरने दुसऱ्या गॅस टँकरला धडक दिल्याने हा स्फोट झाला. स्फोटाच्या आगीत एक्सप्रेस वेवरुन जाणारी इतर 5 वाहनं देखील जळून खाक झाली. या दुर्घटनेत तीनजण गंभीर जखमी झाल्याचे समोर येत आहे.

यमुना एक्स्प्रेस वे हा सर्वात व्यस्त मार्ग असून या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून अग्निशामक दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

यमुना एक्सप्रेस वेवरील अपघातांची मालिका सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वीच एका खाजगी बस आणि ट्रकच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू झाला होता. तर 13 जण जखमी झाले होते.