गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर AIIMS रूग्णालयात दाखल
Manohar Parrikar | (Photo Credits: ANI)

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ( Manohar Parrikar) यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. कॅन्सरच्या आजाराशी लढतानाही सरकारी कामांकडे जातीने लक्ष देत त्यांनी काही दिवसांपूर्वी गोव्यामध्ये अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर आता पुढील उपचारांसाठी त्यांना एम्स (All India Institute of Medical Sciences ) रूग्णालयाच्या कॅन्सर उपचार विभागात गुरूवारी उशिरा दाखल करण्यात आले आहे.

मनोहर पर्रीकर यांना मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कॅन्सरचं निदान झाले. पर्रीकर स्वादूपिंडाच्या कर्करोगाशी सामना करत आहेत. त्यांच्यावर अमेरिकेत उपचार झाले. त्यानंतर प्रकृती खालावल्याने मुंबई, गोवा, दिल्ली येथील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली गोवा मुख्यमंत्र्यांची भेट

सध्या पर्रीकर यांच्यावर दिल्लीमध्ये एम्स रूग्णालयात डॉ. अतुल शर्मा यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.