मणिपूर (Manipur) मध्ये सध्या 12 वी बोर्डाच्या राज्यशास्त्र (Political Science) प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या दोन प्रश्नांवरून चांगलाच गदारोळ सुरु झाला आहे. यंदा इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पेपर मध्ये विद्यार्थ्यांना माजी दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांनी देशाच्या बांधणीसाठी केलेल्या कामातील कोणतेही चार नकारात्मक निर्णय विचारण्यात आले होते, तर दुसरीकडे भाजपचे (BJP) निवडणूक चिन्ह काढण्याच्या प्रश्नाला संपूर्ण 4 गुण देण्यात आले होते. या प्रश्नपत्रिकेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत, या फोटोमध्ये प्रश्न क्रमांक 29 आणि 32 यांच्यात स्पष्टपणे वरील प्रश्न विचारण्यात आल्याचे दिसत आहेत. भारतमाता की जय या घोषणेचा राजकीय जहाल फायद्यासाठी अतिरेकी वापर: मनमोहन सिंह
या प्रशपत्रिकेचे फोटो व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांंनी यावर संताप व्यक्त केला आहे, मणिपूरमध्ये भाजपचे सरकार असल्याने अशा प्रकारे काँग्रेस नेत्याची मानहानी करत स्वतःचा प्रचार करण्याचा मार्ग अवलंबला जातोय असेही काही नेट युझर्सनी फोटोखाली कमेंट मध्ये लिहिले आहे, तर याबाबत काँग्रेसने युजि टी दाखल घ्यावी असाही सल्ला दिलेला दिसून येतो.
पहा व्हायरल प्रश्नपत्रिका
Manipur Board asks the election symbol of BJP in Political Science paper and it carries 4 marks! https://t.co/aCcLw4AW3t
— Angellica Aribam (@AngellicAribam) February 23, 2020
यापूर्वी सुद्धा गुजरात मध्ये आठवी इयत्तेच्या पुस्तकात हिटलर इज सुप्रीमो असा पाठ छापण्यात आला होता तसेच गांधींच्या असहजार चळवळीचे नकारत्मक मुद्दे काय असे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले होते, असे म्हणत एका युजरने कमेंट केली आहे. या माध्यमातून भाजप प्रणित केंद्र सरकार राष्ट्रीय नेत्यांचा व स्वातंत्र्य काळातील पुढाऱ्यांचा अपमान करत आहेत असाही आरोप नेटकऱ्यांकडून लावण्यात येत आहे.
दरम्यान,काल माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिल्ली येथील एका भाषणात नेहरू आणि काँग्रेस पक्षावर स्तुतीसुमने उधळत देशातील शैक्षणिक, राजकीय आणि वैचारिक विकासासाठी नेहरूंचे मोठे योगदान असल्याचे म्हंटले होते, तर भाजपकडून भारत माता की जय सारख्या घोषणांचा वापर करून देशवासियांमध्ये फूट पाडण्याचा जहाल प्रयत्न केला जातोय असा आरोपही मनमोहन यांच्याकडून लगावण्यात आला होता, या सर्व भाषणाच्या नंतर आज ही प्रश्नपत्रिका व्हायरल होता असल्याने अधिक चर्चेत आली आहे. यावर तूर्तास तारो कोणत्याच राजकीय पक्षाने काहीही भूमिका मांडलेली नाही.