माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी आज दिल्ली (Delhi) मध्ये पुरुषोत्तम अग्रवाल आणि राधा कृष्ण यांच्या 'हू इज भारत माता' (Who Is Bharat Mata) या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत असताना आजच्या भारताचे वर्णन करताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारकडून भारतमाता की जय हे घोषवाक्य जहाल पद्धतीने वापरण्यात येतेय यात भावनिक अतिरेक करून आपल्याच राष्ट्रातील अनेकांना वगळण्याचा या घोषणेचा कल दिसून येत आहे असे म्हणत मनमोहन सिंह यांनी अप्रत्यक्षपणे भाजप (BJP) प्रणित केंद्र सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला होता. यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांच्या कामाचा पाढा वाचून दाखवत त्यांनी आज भारताच्या लोकशाहीला बलाढ्य देशांसोबत तोलले जाण्यामागे नेहरूंचे योगदान असल्याचेही म्हंटले आहे. अमित शाह यांच्या टेबलवर फाईल, सोनिया - राहूल गांधी यांची नागरिकता धोक्यात: भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांचा दावा
मनमोहन सिंह यांनी भाषणात, "देशात अस्थिरता होता त्यावेळी नेहरुंनी देशाचं नेतृत्व केलं. वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय विचारांना त्यांनी आपलसं केलं . बहुभाषी असलेल्या नेहरुंनी अतिशय अनोख्या पद्धतीने आधुनिक भारताच्या विद्यापीठांची आणि सांस्कृतिक संस्थांची पायाभरणी केली अशा शब्दात नेहरू आणि योगायोगाने काँग्रेस पक्षावर स्तुतीसुमने उधळली तर दुसरीकडे, दुर्दैवाने सध्या देशाताली एका गटाला इतिहास वाचण्यात कुठलीही रुची नाहीए. तसंच ते पूर्वग्रहाने पुढे वाटचाल करत आहेत. यामुळेच ते नेहरुंची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अशा खोटेपणाला नाकारण्याची क्षमता इतिहासात आहे, असहा शब्दात भाजपला सुद्धा टोलवले आहे
मनमोहन सिंह भाषण (ANI ट्विट)
#WATCH Former Prime Minister & Congress leader Manmohan Singh, in Delhi: Nationalism and the slogan of 'Bharat Mata Ki Jai' are being misused to construct a militant and heavily emotional idea of India that excludes millions of residents and our citizens. pic.twitter.com/YW6XLy6FLZ
— ANI (@ANI) February 22, 2020
दरम्यान, 'हू इज भारत माता' या पुस्तकाविषयी बोलताना हे पुस्तक वास्तवाला धरून आहे. राष्ट्रवाद आणि 'भारत माता की जय' च्या घोषणा ह्या देशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी काही गटांकडून प्रयत्न केला जातोय हा या घोषणेचा दुरुपयोग आहे आणि यामुळे लाखो नागरिकांमध्ये दुरावा निर्माण होतोय, असं मनमोहन सिंह यांनी आपल्या भाषणातून म्हंटले आहे.