Police at Blast Site | PC: Twitter/ANI

कर्नाटकातील (Karnatak) मंगळूरू (Mangaluru) मध्ये एका ऑटो रिक्षा मध्ये ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे. 109 नोव्हेंबरच्या या घटनेचा व्हीडिओ देखील आता सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे. रिक्षा मधून कूकर बॉम्ब (Cooker Bomb) घेऊन जात असताना ब्लास्ट झाल्याने सारा परिसर हादरला होता. यामध्ये रिक्षाचालकासह प्रवासीदेखील जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान प्रवासी आरोपी Mohammed Shariq आहे. या घटनेनंतर कर्नाटकचे पोलीस महासंचालक यांनी हा प्रकार अपघात नसून दहशतवादी घटना आहे. कर्नाटक पोलीस केंद्रीय यंत्रणांसोबत मिळून या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. असं म्हटलं आहे.

Mohammed Shariq याला Unlawful Activities (Prevention) Act (UAPA) अंतर्गत अटक झालेली आहे. त्याने Mangaluru च्या भिंतींवर ग्राफिटी केल्याने त्याला अटक केली होती. सोबतच एका दहशतवादी कारवाईच्या प्रकरणातही तो फरार होता. पोलिसांच्या वॉंटेंड लोकांच्या यादीत त्याचं नाव आहे.

ऑटो रिक्षा ब्लास्ट मध्ये Mohammed Shariq सह रिक्षाचालकाला 40% भाजल्याच्या जखमा आहेत. The Forensic Science Laboratory Division

ची टीम रविवारी Shariq राहत असलेल्या भाड्याच्या घरी पोहचली होती. तेथून काही स्फोटक पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, तपास करणार्‍यांना एक मोबाईल फोन, 2 फेक आधार कार्ड्स, एक फेक पॅन कार्ड आणि FINO debit card आढळलं आहे. संशयित आरोपी घरी स्फोटक डिव्हाईज बनवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.