Mahindra & Mahindra Stock News: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा कॅनडातील व्यवसाय बंद, भारतीय शेअर बाजारात खळबळ
Mahindra & Mahindra | (Photo credit: archived, edited, representative image)

महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) कंपनीने आपला कॅनडामधील सर्व व्यवसाय बंद करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (21 सप्टेंबर) मोठी खळबळ उडाली. आपल्या निर्णयाबाबत (Mahindra and Mahindra) द्वारा जेव्हा एक्स्चेंजला अधिकृतरित्या कळवले तेव्हा बाजारात या कंपनीचे शेअर्स जवळपास 3% नी घसरले. कंपनीने म्हटले आहे की, त्यांची कॅनडा-आधारित उपकंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने आपला व्यवसाय पूर्णपणे थांबवला आहे. मुंबईस्थिती एम अँड एम (M&M) ऑटोमेकरकडे कंपनीकडे असलेला 11.18% हिस्सा होता. जो बद करण्यासाठी अधिकृतरित्या अर्ज करण्यात आला होता.

M&M बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला अर्जाद्वारे माहिती देताना म्हटले आहे की, आम्ही आपल्याला सूचीत करु इच्छितो की, आमची सहयोगी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशन, कॅनडा, ज्यात आमचा 11.18% हिस्सा होता. तो आम्ही संपुष्टात आणू इच्छितो. त्यासाठी आम्ही अधिकृत अर्ज केला होता. M&M एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत कंपनीने पुढे म्हटले आहे की, Resson Aerospace चे अस्तित्व संपुष्टात आले आहे. 20 सप्टेंबर 2023 पासून भारतीय लेखा मानक (IndAS) अंतर्गत कंपनीचे सहयोगी असणे देखील आम्ही बंद केले आहे. Resson ला कॉर्पोरेशन्सकडून कॅनडा 20 सप्टेंबर 2023 रोजी करार अधिकृतपणे संपुष्टात आणल्याचे प्रमाणपत्रही मिळाले आहे.

ट्विट

दरम्यान, महेंद्रा अँड महिद्राच्या निर्णयाचे वृत्त बाजारात येताच भागधारकांमध्ये खळबळ उडाली. एका तणावात्मक स्थितीमध्ये भागधारकांनी समभाग विकण्याचा सपाटा लावला. ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीही घसरला. ज्यामुळे गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले. महिंद्रा आणि महिंद्राचे शेअर्स ₹1,580 च्या इंट्राडे नीचांकी स्तरावर म्हणजेच 3.3% पर्यंत घसरले.तर बाजार भांडवल ₹1.96 लाख कोटीवर घसरले. बाजार सुरु झाला तेव्हा सुरुवातीस इंडेक्स हेवीवेट बीएसई 1,634.05 रुपयांवर उघडला. जो या आधी बाजार बंद झाला त्याच्या किंचीत अधिक (₹1,635.05) होता. मागील बंद किमतीच्या तुलनेत ₹1,635.05 वर थोडा जास्त उघडला.

वाचकांच्या माहितीसाठी असे की, महिंद्रा अँड महिंद्राने सन 2018 मध्ये कॅनडातील IT फर्म रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनचे 10% शेअर भांडवल मिळवण्यासाठी समभाग नोंदणी करारावर स्वाक्षरी केली होती.