Maharashtra Winter Assembly Session 2020: महाराष्ट्र राज्याचे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा कोरोनाची परिस्थिती पाहता नागपूर (Nagpur) ऐवजी मुंबईत (Mumbai) होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हे अधिवेशन येत्या 14-15 डिसेंबरला पार पडणार आहे. याबद्दल संसदीय कामकाज मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी माहिती दिली आहे. परंतु यावर आता भाजपकडून (BJP) प्रश्न उपस्थितीत करण्यात आला आहे. ऐवढेच नव्हे तर सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हे हिवाळी अधिवेशन दोन दिवस नव्हे तर दोन आठवड्यांचे असावे अशी मागणी केली आहे.(MNS To Maharashtra Government: लष्करातील जवान, माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारांबाबत मनसेची राज्य सरकारकडे महत्वाची मागणी)
देवेंद्र फडणवीस यांनी पुढे बोलताना असे ही म्हटले आहे की, राज्यात शेतकरी समस्येत आहेत. त्यांना काहीच मदत मिळालेली नाही. त्याचसोबत महिलांवरील अत्याचारांमध्ये ही वाढ झाली असल्याचे फडवणीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे अशा मुद्द्यावर चर्चा करुन तोडगा काढण्याची गरज आहे. परंतु सरकार यासाठी तयारच नाही आहे. असे दिसते की सरकारला हिवाळी अधिवेशनाला सामोरे जायचे नसल्याची ही टीका फडवणीस यांनी राज्य सरकावर केली आहे.(Maharashtra Winter Assembly Session 2020: महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई मध्ये होणार)
We demand that such issues be taken up for discussion and a solution be sought. But the govt is not ready to discuss anything. In a way, govt does not want to face the Assembly session: Devendra Fadnavis, Leader of Opposition in Maharashtra Assembly https://t.co/CXj3WZdXfr
— ANI (@ANI) December 3, 2020
यापूर्वी 7 डिसेंबर पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार होतं. दरम्यान, हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई आयोजित करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरमध्ये अधिक थंडी असते त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता दाट आहे. त्याचसोबत कोविड-19 चा संसर्ग वाढू नये यासाठी मुंबईत अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. तर विशेष नियमांचे पालन करत हे अधिवेशन पार पडणार आहे.