Raj Thackeray & Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook-PTI)

कोरोनावर (Coronavirus) मात करण्यासाठी जगभरातील अनेक वैज्ञानिक लस (COVID-19 Vaccine) शोधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. कोरोनावर शंभर टक्के गुणकारी ठरणारी लस कधी विकसित होईल? याबाबत अद्याप काहीच सांगता येत नाही. परंतु, कोरोनाची लस सर्वप्रथम आपल्याला मिळावी, यासाठी अनेकजण लॉबिंग करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कोरोनाची लस आल्यानंतर ती सर्वप्रथम डॉक्टर, पोलीस आणि कोरोना सेवकांनाच दिली जाणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले होते. राज्य सरकारच्या या निर्णयावर मनसे (MNS) नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच डॉक्टर, पोलिसांसह लष्करातील जवान आणि माजी सैनिक व त्यांच्या परिवाराचे अग्रक्रमाने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कोरोनाची लस आल्यावर ती डॉक्टर, पोलीस व इतर आरोग्य सेवकांना प्रथम देण्यात येणार असे काल आरोग्य मंत्री बोलले, परंतु या बरोबरच सर्व सैनिक , माजी सैनिक व त्यांच्या परिवारा ला अग्रक्रमाने लसीकरण करण्यात यावे कारण हे सर्वच देशासाठी बलिदान देण्यात अग्रेसर असतात, अशा आशयाचे ट्विट बाळा नांदगावकर यांनी केले आहे. हे देखील वाचा- Maha Vikas Aghadi: शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल- संजय राऊत

बाळा नांदगावकर यांचे ट्विट-

दरम्यान, अदर पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे उत्पादन सुरु आहे. मिळालेल्या आतापर्यंत 4 कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्युटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस 70 टक्के परिणामकारक आहे. लोकांपर्यंत लस पोहचवण्याची तयारी आम्ही करतो आहोत. सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लशीची किंमत असणार आहे, असे सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला म्हणाले आहेत. जुलै 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध करणारअसल्याचे अदर पुनावाला यांनी स्पष्ट केले आहे.