Rahul Gandhi | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. राज्यभर उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. या राजकीय धुमश्चक्रीमध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  देखील सहभागी होणार आहेत. 13 आणि 15 ऑक्टोबर दिवशी प्रचारसभा घेणार आहेत. राहुल गांधींची पहिली सभा 13 ऑक्टोबर दिवशी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून राहुल गांधी परदेशात असल्याने विरोधकांकडून टीकेचे धनी झाले होते. मात्र आता त्यांच्या दौर्‍याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

मागील काही दिवसांपासून राहुल गांधी बॅंकॉंकमध्ये, कंबोडिया मध्ये असल्याच्या चर्चा ट्विटरवर रंगल्या होत्या. कॉंग्रेस पक्षाकडून अशा बातम्यांना दुजोरा दिला नसला तरीही फेटाळल्याही नव्हत्या. राहुल गांधी बँकॉक मध्ये नव्हे तर कंबोडिया मध्ये विपश्यना करत असल्याची शक्यता: सूत्र

ANI Tweet 

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणूकीची धूम आहे. मात्र देशासह राज्यातही कॉंग्रेस पक्षामध्ये गळती सुरू असल्याने अनेक मोठे नेते भाजप-शिवसेना पक्षात गेल्याने आता कॉंग्रेस कार्यकर्त्यांना नव उभारी देण्याचं आव्हान राहुल गांधींसोबतच कॉंग्रेस नेतृत्त्वासमोर आहे. यंदाच्यानिवडणूकीतही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र निवडणूकांना सामोरं जाणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 24 ऑक्टोबरला लागणार आहे.