महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 च्या धामधूमीत राहुल गांधी Bangkok सहलीला गेल्याची चर्चा; ट्विटरवरही नेटकर्‍यांनी उडवली खिल्ली
राहुल गांधी | (Photo Credit: IANS)

जगभरात घडणार्‍या अनेक लहान मोठ्या गोष्टींची आजकाल अवघ्या एका क्लिकवर सोशल मीडियामध्ये मिळतात. शनिवार, 5 ऑक्टोबरच्या रात्री ट्वीटरवर Bangkok हा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये होता. यामागील कारण होतं राहुल गांधी. ट्विटरवर नेटकर्‍यांनी केलेल्या दाव्यानुसार, राहुल गांधी काल सकाळी विस्तारा एअरलाईन्सने बॅंकॉकला गेले आहे. थायलंड देशातील बॅंकॉंक येथे ते फॉरेन ट्रीपला गेले आहेत या विषयावरून ट्वीटरवर अनेकांनी मजेशीर ट्वीट केले आहे. सध्या भारतामध्ये 21ऑक्टोबर दिवशी महाराष्ट्र, हरयाणा येथे विधानसभा निवडणूका आहे. या पार्श्वभूमी कॉंग्रेस नेते राहुल गांधी बॅंकॉंकला फिरायला जाणं यावरून चर्चा रंगायला लागली आहे.

कॉंग्रेस पक्षाकडून राहुल गांधी यांच्या 'बॅंकॉक ट्रीप' बद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र त्यासोबतच हे वृत्त फेटाळण्यातही आलेले नाही. सध्या महाराष्ट्रासह देशभरात कॉंग्रेस पक्षामध्ये गळती सुरू आहे. पक्ष संघटना कमजोर होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचे अशाप्रकारे फिरयला जाणं चर्चेचा विषय ठरला आहे. वाराणसी: राहुल गांधी यांना पक्ष सांभाळता येत नाही देश काय चालवणार: रामदास आठवले यांचा काँग्रेसला टोला

पहा राहुल गांधी यांच्याबददलचे ट्वीट्स

हरयाणा, महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूका आहेत. 24 ऑक्टोबरला मतदान निकाल आहे. यापार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाने 10-19 ऑक्टोबर दरम्यान रॅलीचं आयोजन केले आहे. लोकसभा निवडणूक 2019 दरम्यान कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या पराभवानंतर राहुल गांधींनी कॉंग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.