Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

8 जूनला यंदा 12वीचा निकाल (HSC Result 2022) लागल्यानंतर आता 10वीचा निकाल (SSC Result 2022) 17 जून 2022 दिवशी जाहीर केला जाणार आहे. हा निकाल विद्यार्थी विषयनिहाय उद्या ऑनलाईन पाहू शकणार आहेत. नंतर शाळेमध्ये त्यांना गुणपत्रिका वाटप  करून अधिकृत निकाल दिला जाईल. पण हा  ऑनलाईन निकाल उद्या कसा, कुठे आणि किती वाजता बघायचा हा प्रश्न तुम्हांला असेल तर खालील गोष्टी नीट लक्षात ठेवा म्हणजे उद्या निकाल पाहताना तुमची गडबड होणार नाही.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केल्यानुसार काही अधिकृत वेबसाईट्स आणि काही थर्ड पार्टी साईट्सच्या माध्यमातून निकाल पाहता येईल. हा निकाल पाहण्यासाठी तुम्हांला तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव सबमीट करून निकाल पाहता येणार आहे. नक्की वाचा: Maharashtra Board 10th Result 2022: 10वी चा निकाल उद्या mahresult.nic.in सह ऑनलाईन कसा, कुठे पाहू शकाल?

10 वीचा निकाल कोणत्या वेबसाईट्सवर निकाल पहाल?

mahresult.nic.in  http://sscresult.mkcl.org  https://ssc.mahresults.org.in या अधिकृत वेबसाईट्सवर तुम्हांला निकाल पाहता येणार आहे. 

10वी निकालाच्या वेळा

दरम्यान बोर्डाच्या नियमांनुसार दुपारी 11 च्या सुमारास बोर्डाकडून निकालाची माहिती दिली जाते. यावेळी केवळ बोर्डाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांचा एकूण निकाल, उत्तीर्ण मुलांचे आणि मुलींचे प्रमाण अशी ठळक वैशिष्ट्यं सांगितली जातात. नंतर 1 वाजता ठीक ऑनलाईन निकाल अधिकृत वेबसाईट्सवर जाहीर केला जाईल. इथे तुम्हांला विषयनिहाय गुण आणि एकूण टक्के पाहता येतील.

यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेल्यांची संख्या १६,३८,९६४ होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. या सार्‍यांची निकालाची उत्सुकता उद्या दुपारी 1 वाजता संपणार आहे. त्यानंतर 11वी प्रवेशासाठी लगबग सुरू होईल.