Madhya Pradesh Shocker: युवकाचा नदीत बुडून मृत्यू; गावकऱ्यांनी झाडाला उलटे लटकावला मृतदेह, समोर आले धक्कादायक कारण
Death (Photo Credits-Facebook)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) गुना (Guna) जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. इथे एका तरुणाचा जीव वाचवण्याच्या आशेने त्याच्या मृत शरीरावर 15 मिनिटांसाठी अत्याचार करण्यात आले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असे सांगितले जात आहे की, युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. त्यानंतर गावकऱ्यांना आशा होती की त्याचा जीव वाचू शकेल. म्हणून त्यांनी त्याचे पाय दोरीने बांधले व त्याला झाडावर उलटे लटकवले. त्यानंतर बराच वेळ काहीच घडले नसल्याने गावकऱ्यांनी हार मानली.

ही घटना कुंभराजच्या जोगीपुरा गावची आहे. कुंभराजमधील बांसाहेड़ा येथील रहिवासी भंवरलाल बंजारा सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास जोगीपुरा गावाच्या नदीत स्नान करण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो अचानक बुडू लागला. लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह बाहेर काढला.

त्याचवेळी सानई चौकी प्रभारी तोरन सिंह हेही आपल्या दलासह उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, घटनास्थळी पोहचलेल्या भंवरलालच्या कुटुंबीयांना वाटले की तो अजूनही श्वास घेत आहे. यामध्ये कोणीतरी सूचित केले की, त्याला झाडावर उलटे लटकवले पाहिजे. यावेळी असा दावा केला की उलटे लटकल्याने शरीरातील पाणी बाहेर पडेल. चौकीचे प्रभारी तोरण सिंह यांनी पुढे सांगितले की, त्यांनी गावकऱ्यांना समजावून सांगितले पण त्यांनी ऐकले नाही. (हेही वाचा: Andhra Pradesh Shocker: पतीची हत्या करुन रचला अपघाताचा बनाव, पोलीस चौकशीतून धक्कादायक माहिती उघड)

अखेर गावकऱ्यांनी भंवरलालचे पाय बांधले आणि त्याला झाडावर उलटे लटकवले. त्यानंतर सुमारे 15 मिनिटे त्यांनी वाट पहिली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्याचा व्हिडिओही बनवला. व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित असल्याचे दिसत आहे. 15 मिनिटांनंतर जेव्हा शरीर हलले नाही, तेव्हा प्रत्येकाला खात्री झाली की तो मरण पावला आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह खाली उतरवला आणि पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. भंवरलाल तीन मुलांचे वडील होते व ते शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.