आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) गुंटूर (Guntur) जिल्ह्यातील ताडीकोंडा (Tadikonda) येथील एका महिलेने आपल्या पतीची हत्या (Murder) करून त्याचा आपघाती मृत्यू (Accidental Death) झाल्याचा बनाव रचल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, पाय घसरून पडल्याने डोक्याला दुखापत झाली, असे सांगत संबंधित महिलेने तिच्या पतीला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. परंतु, अंत्यसंस्काराची तयारी करताना मृत व्यक्तीच्या डोक्याला दुखापत असल्याचे निदर्शनास येताच नातेवाईकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृताच्या पत्नीची कसून चौकशी केली. त्यानंतर तिनेच पतीची हत्या केल्याचे तिने कबूली दिली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
चिलाका रमेश असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रमेशचे गेल्या दहा वर्षांपूर्वी निर्मलासोबत प्रेमविवाह झाला होता. ताडीकोंडा कृषी बाजाराच्या आवारात सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा रमेश पाच वर्षांपूर्वी अर्धांगवायूपासून मुक्त झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश आणि निर्मला यांच्यात गेल्या काही वर्षांपासून किरकोळ कारणांवरून सतत भांडण व्हायची. दरम्यान, शुक्रवारी रमेश पाय घसरून पडल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान रमेशचा मृत्यू झाल्याचे निर्मलाने त्याच्या नातेवाईकांना सांगितले. परंतु, अंत्यसंस्कारादरम्यान रमेशच्या डोक्याला दुखापत असल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. रमेशच्या पत्नीनेच त्याला मारहाण केली असता त्याचा मृत्यू झाल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांना आला. ज्यामुळे रमेशच्या नातेवाईकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी रमेशच्या पत्नीची कसून चौकशी असता धक्कादायक माहिती समोर आली. हे देखील वाचा- Surat Crime: आई- बहिणीची हत्या करून महिला डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न
निर्मला हिनेच रमेशच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचे चौकशीतून उघड झाले. मात्र, आपला गुन्हा लपवण्यासाठी निर्मलाने रमेश पाय घसरून पडल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच निर्मलाने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.